*बर्थडे केक घेण्याच्या बहाण्याने एका तरूण ग्राहक मुलाने, बेकरी चालकाचा दहा हजाराचा मोबाईल चालता-बोलता लंपास केला होता-आज बेकरीचे मालक विनोद मनचंदानी यांना मोबाईल परत देताना पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी....*
*चोरी व मोबाईल गहाळ झालेल्या तक्रारकर्ता नागरिकांच्या आशा दोंडाईचा पोलीसांपुढे पल्लावल्या...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* मागे अडीच महिन्यापूर्वी शहरातील गजबजलेल्या निर्मल एम्पोरियम चौकात जय-माताजी बेकरी मालकाला एकाने ग्राहक बनून बर्थडे केक घेण्याचा बहाण्याने मोबाइल मागत चालता-बोलता दहा हजार रूपये किमंतीचा मोबाईल लंपास करण्याची घटना घडली होती. म्हणून दिवसाढवळ्या माणसांची रहदारी असलेल्या एरियात घटना घडल्याने दुकानदांरामध्ये भितीयुक्त चिंतामय वातावरण निर्माण झाले होते. म्हणून जनमत-ने घटनेची दखल घेत बातमी प्रसिद्ध केली व आज अडीच महिन्याच्या अवधीतच दोंडाईचा पोलीसांनी सायबर विभागमार्फत मोबाईल ट्रँकींगवर टाकून संबधित दुकान मालकास मोबाईल परत मिळवून दिला. त्यामुळे आता गावात ज्यांचे मोबाईल चोरी किंवा हरवले आहेत,अशांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की,शहरातील नेहमी राजकीय सभा,गप्पा, बैठक-मैफीली, लग्नसराई सोबत विविध खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या व माणसांनी नेहमी गजबजलेल्या निर्मल एम्पोरियम चौकात दिनांक ४ आँगस्ट बुधवार रोजी दुपारी १.०० ते १.३० वाजेच्या दरम्यान दिवसाढवळ्या एका अज्ञात तरूणाने दुकानात घुसतांना तोंडाला मास लावत. बर्थडे केक घेण्याच्या बहाण्याने केकच्या भाव-रावाची तपासणी केली व मी फोन आणला नसुन, मला मित्राला फोन करून केक कोणता घ्यायचा आहे, हे विचारायचे आहे असे सांगत. ब्रेकरी दुकानदाराचा मोबाईल मागितला व दुकानदाराने ही ग्राहक आहे,म्हणून मोबाईल दिला. मात्र पहिल्या वेळेस दुकान दाराचा भाऊ दुकानात बाहेर गावाहून आलेल्या मालाची ने-आण करत असल्यामुळे त्याची हिमंत झाली नाही व मोबाईल परत केला. पुन्हा वेगवेगळे महागडे केक पाहू लागला व तशातच त्याला संधी दिसली व पुन्हा दुकानदाराकडून मोबाईल मागितला. दुकनदारानेही विश्वास ठेवत पुन्हा मोबाईल दिला. मात्र त्याला जसा पळण्याचा मार्ग सुकर दिसला.तसा त्याने कानाला मोबाईल लावत चालता-बोलता पळ काढला.अशावेळेस दुकानदाराला जसे कळेल तेवढ्यात तो बराच लांब चालला गेला होता. ब्रकेरी दुकानदाराने आरडाओरड केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. नंतर भाऊला दुकानावर बसवून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.त्याचाही फायदा झाला नाही. शेवटी समाजाचे सिन्धी पंचायत अध्यक्ष व माजी नगरसेवक यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची कल्पना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत.सीसीटीव्ही फुटेज गोळा करत. दोंडाईचा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती.
आज जवळपास फक्त अडीच महिन्याच्या कालावधीत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक राकेश खांडेकर, संदीप कदम, योगेश पाटील, राजेंद्र सोनवणे आंदीनी सायबर विभाग धुळे मार्फत सतत पाळत ठेवत. मोबाईल ट्रँकींगवर टाकून जय-माताजी ब्रेकरीचे मालक विनोद सुरेशलाल मनचंदानी यांना आज आपला ९७००/रूपयांचा अँपो कंपनीचा ब्लँक कलरच्या मोबाईल परत मिळवून दिला. त्यामुळे बेकरी दुकानदाराला समाधान मिळाले व यामुळे गावात पोलीसांच्या कामगिरीची चांगली छाप पडली आहे.
तसेच सदर बेकरी चालकाचा चोरी झालेला मोबाईल दोंडाईचा पोलिसांनी अडीच महिन्यातच मिळवून दिल्याने, गाव व परिसरात मागील काही महिन्यांपूर्वी अनेकांचे मोबाईल चोरीला किंवा हरवले असुन, आता त्यांच्या आशा दोंडाईचा पोलीसांकडून वाढल्या आहेत. म्हणून दोंडाईचा पोलीस मोबाईल बाबत नागरिकांच्या पल्लवीत झालेल्या आशांना निश्चित न्याय देतील, अशी दुर्ढ भावना येथील जनता बाळगुन आहे.

0 Comments