धुळे-चाळीसगाव रेल्वेचा १५ ऑक्टोबर ला 121 वा वाढदिवस....
१५ ऑक्टोबर १९०० या दिवशी धुळे-चाळीसगांव ही पहिली रेल्वे धावली,या १२० वर्षाच्या काळात या रेल्वेत केवळ एकच बदल झालाय तो म्हणजे कोळशाचे इंजिन ते डिझेल इंजिन हाच तो काय बदल.
झुकू झुकू आगीन गाडी...धुरांच्या रेषा हवेत सोडी....अशी आठवणींची सैर घडवत या खान्देश राणीने खान्देश वासीयांच्या मनात एक हळवा कोपराही अधोरेखित केलाय.गरीब रथ म्हणून देखील ग्रामीण भागातील जनतेशी आपलं पणाचं नातं या रेल्वेने आजही कायम ठेवलंय. ५६ किलोमीटरच्या अंतरात ९ स्थानक आहेत, यात प्रामुख्यानं भोरस, जामदा,राजमाने, मोरदड तांडा,शिरुड, बोरविहिर,मोहाडी,धुळे असा ५६ किमीचा हा प्रवास. मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या या रेल्वेनं धुळ्याला दुधाचा जिल्हा म्हणून ओळख दिली , धुळे जिल्ह्यातून मुंबईला दुधाच्या वाघिणीतून पुरवठा होत असे, आज ही पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय दूध डेअरी पर्यंत रेल्वे रूळ असल्याचं पाहायला मिळेल.
अवघ्या १५ रुपयात चाळीसगांव-धुळे हा प्रवास होतो, एस टी ने याच मार्गानं जायचं असल्यास ६४ रुपये प्रवाशांना मोजावे लागतात.त्यातच एस टी ने धुळे-औरंगाबाद बस सेवा बायपास विनावाहक केल्यानं चाळीसगांव बस स्थानकाकडे या एस टी बसेस येत नसल्यानं प्रवाश्यांना धुळे-चाळीसगांव या रेल्वेचा मोठा आधार आहे, शिवाय एस टी पेक्षा प्रवास भाडे कमी असल्यानं गरीब रथ म्हणून ही रेल्वे सेवा परिचित आहे.

0 Comments