Header Ads Widget

शिरपुर तालुक्यात गांजा शेती विरुध्द कारवाईचा धडाका सुरु असून गधडदेव छापा टाकत पोलिसांनी २० लाखाची गांजाची जप्त


धुळे, 13 ऑक्टोबर (हिं.स.) शिरपुर तालुक्यात गांजा शेती विरुध्द कारवाईचा धडाका सुरु असून गधडदेव शिवारात डोंगराच्या मध्ये वन शेतात छापा टाकत पोलिसांनी २० लाखाची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

ही कारवाई सायंकाळी करण्यात आली. शिरपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील गधडदेव गावाचे शिवारात दक्षिणेस असलेल्या डोंगराच्यावर जावून गांजा शेतीवर छापा टाकला. पोलिसांनी थेट डोंगराच्या मध्यावर शेत जमिन खेडणार्या कोकराज रेशा पावरा याच्या शेतात जावून या ठिकाणी लागवड केलेले १ हजार २४ किलो वजनाचे गांजाची रोपे उपटून जप्त केली. या कारवाईत प्रती किलो २ हजार रुपये याप्रमाणे २० लाख ४९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा गांजा सदृश अंमली पदार्थ पिकवल्या प्रकरणी कोकराज रेशा पावरा रा.गधडदेव ता.शिरपूर याच्यावर पो ना भुषण दयाराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एनपीडीए ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कोकराज पावरा हा फरार असून पोलिस शोध घेत आहेत.


Post a Comment

0 Comments