राज्यातील ज्या बाजार समित्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ २३ ऑक्टोबरपर्यंत संपत आहे. ज्या बाजार समितीवर प्रशासक मंडळ आहे, त्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल. २३ ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुका मुदतीत होतील.
बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी, अंतिम मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार मुदत संपलेल्या व प्रशासक असलेल्या बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या ३० सप्टेंबर २०२१ या अर्हता दिनांकानुसार तयार करण्यात येतील. २३ ऑक्टोबरनंतर मुदत संपणाऱ्या समित्यांसाठी प्राधिकरणाकडून अर्हता दिनांकानंतर यथोचित प्रक्रिया जाहीर केली जाईल.
ही यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ८ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येईल. ही प्रारूप यादी जाहीर करून त्यावर हरकती, आक्षेप मागविल्या जातील. नंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. नंतर डिसेंबरच्या मध्यात बाजार समितीसाठी निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येईल. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू झाली आहे.
जिल्ह्यात धुळे, साक्री व शिरपूर या तीन बाजार समितीची मुदत संपल्याने त्यांची निवडणूक होईल. साक्री बाजार समितीची मुदत २७ ऑक्टोबर संपत आहे. त्यामुळे या समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आता निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
.

0 Comments