⭕राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वाटपाचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ...

अमळनेर-मतदारसंघात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील नुकसानीचे पंचनामे सुरू असून ते पूर्ण झाल्यावर येत्या हिवाळी अधिवेशनात नुकसान भरपाई निधी मंजुरीसाठी जोमाने प्रयत्न करून शेतकऱ्यांना 100 टक्के न्याय मिळवून देईल अशी ग्वाही आ.अनिल पाटील यांनी प्रमाणित बियाणे वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी दिली.
कृषी विभागातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वाटपाचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते श्याम धरती कृषी केंद्र येथे करण्यात आला,यावेळी अनेक शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात आले.शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुदान तत्वावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हे प्रमाणित बियाणे वाटप करण्यात आले.प्रामुख्याने उपस्थित शेतकऱ्यांना अनुदानित किमतीवर ज्वारी व हरभरा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदारांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करत अतिवृष्टीमुळे आज संकट आले असले तरी धीर सोडू नका महाविकास आघाडी शासन आपलेच असल्याने व शेतकरी राजा बळकट असल्याने या संकटात तो नक्कीच तरेल असा विश्वास व्यक्त केला.
उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर यांनी यावेळी महाडीबिटी पोर्टलवरील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भरत वारे, आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुनील पवार, डी. बी. साळुंखे, डॉ. विलास पाटील, उमाकांत साळुंखे, रणछोड पाटील, प्रदीप निकम, मयुर कचरे, प्रवीण पाटील, आर.एच. पवार, दिनेश पाटील, शेतकरी भैय्यासाहेब पाटील, पंकज पाटील, अनसिंग पाटील, दिनेश भावसार, रविंद्र साळुंखे, मोहन टिळक, सुभाष पाटील, सचिन पाटील, प्रवीण सोनवणे, काशिनाथ खैरनार, योगेश खैरनार, अमोल कोठावदे, राहुल पाटील, विजय जैन, भूषण पाटील, दीपक पाटील, महेंद्र पाटील, अजय पवार यांच्यासह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

0 Comments