कासारे---(प्रतिनिधी) अंधश्रद्धा व प्रण्यांच्या विविध अवयवांच्या तस्करीपायी होणारी पशु-पक्षांची कत्तल ही पर्यावरणाच्या असंतूलनाचे मोठे कारण असून ,यातून धोक्यात येवू घातलेले मानवी जीवन वाचवायचे असेल तर पर्यावरणीय जैव- विविधता टीकवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खरे यांनी केले.
साक्री तालुका निसर्ग मित्र समिती, पिपंळनेरचा वन विभाग व बहुउद्देशिय माध्यमिक विद्यालय कासारे यांच्या संयुक्त विद्यमाने,या विद्यालयातच 4 ऑक्टोबर रोजी, आयोजित वन्यजीव सप्ताह निमित्ताने "वन्यजीव संवर्धन काळाची गरज " या विषयावरील व्याख्यानात महाराष्ट्र शासनाचे वन्यजीव संवर्धक व अभ्यासक अमित खरे बोलत होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संचालक संजय यशवंतराव देसले हे होते, तर प्रमूख पाहूणे म्हणून पिंपळनेरच्या वनपरिक्षेत्राचे क्षेत्राधिकारी के.आर.माळके,वन संरक्षक ए.पी.पवार,धुळे जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य सुरेश भाऊ पारख,निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले ,तालुका उपाध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें,मुख्याध्यापक के.डी.सोनवणे,नि.मि.स.सदस्यांत डाॅ. अजय नांद्रे,मनोहर भामरें,राजेंद्र देसले,प्रदीप सावळे आदि उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनातून खरे पुढे म्हणाले की,शालेय विद्यार्थ्यांबरोबर प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या गांवात,तालुक्यात,जिल्ह्यात व ,राज्यांत असलेली जैव विविधता कोणती आहे ,तीची माहिती करून घेण्याबरोबर तीच्या संवर्धनार्थ आपण काय करायला हवे? याची जाणीव-जागृती व्हावी यासाठी 1957 पासून हा वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असल्याचे सांगितले .दि.2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अशा व्याख्याना शिवाय,वन्यजीव संवर्धन संबधीच्या विविध स्पर्धांचे आयोजन करणे, रॅलीज् काढणे,क्षेत्र भेटी.आदींचे आयोजन करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच त्यांनी हत्ती या अतिशय हुशार प्राण्याच्या वर्तनाचे काही अनुभवलेले प्रसंग व बिबट्या सारख्या प्राण्यांपासून स्व संरक्षण कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले.
सरस्वती व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रारंभीच मान्यवरांच्या हस्ते करून सुरूवात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.एम् भामरें यांनी केले. या प्रसंगी विलास देसले व राजेंद्र देसले यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन बी.डी.तोरवणे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रदीप सावळे यांनी करून दिला . बहुउद्देशिय माध्यमिक विद्यालय व पंचक्रोशीतील विविध शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मास्क लावून लाभ घेतलेल्या या व्याख्यानाची सुरूवात स्वागत गीताने तर सांगता वंदेमातरम् ने झाली.

0 Comments