धुळे- येथील सामाजिक कार्यकर्ते उन्नती मित्र मंडळाचे माजी संस्थापक अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल परिवारातील ज्येष्ठ साथी दादासाहेब वसंतराव खानकरी यांचा सामाजिक कार्याचा कृतज्ञता समारंभ पंढरपूर येथील लाडशाखीय वाणी समाज संस्थेच्या पंढरपूर धर्मशाळा कार्यकारणीच्या वतीने नुकताच उन्नती विद्यालय, धुळे येथे साजरा करण्यात आला याप्रसंगी दादासाहेब खानकरी यांचा पुणेरी पगडी, शाल श्रीफळ, विठ्ठल-रुक्माईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक श्रावण सोनजे व ॲड. नानासाहेब खुटाडे यांनी आपल्या मनोगतातून दादासाहेब खानकरी यांच्या समाजकार्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना दादासाहेब खानकरी यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करून पंढरपुर धर्म शाळेसाठी देणगी जाहीर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर धर्मशाळेचे अध्यक्ष अरुण शिरोडे हे होते; तर प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री नानासाहेब खुटाडे, अशोक श्रावण सोनजे, डॉ जी.पी.वाणी, विलास शिरोडे, संजय मालपुरे, विशाल केले, सुरेश नेरकर साहेब व लाडशाखीय वाणी समाज संस्था पंढरपूर धर्मशाळा या संस्थेचे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वाणी समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण अमृतकर यांनी तर आभार संजय मालपुरे यांनी मानले .

0 Comments