Header Ads Widget

*संघर्षाच्या अथांग सागरात मिळालेल्या यशामुळे धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमचे नेते आदरणीय श्यामदादा सनेर याचे मनापासून अभिनंदन*


नरडाणा---नेतृत्व म्हणजे तांत्रिकदृष्ट्या समाजात उपस्थित होऊन सिध्द होणारी प्रक्रिया नाही तर ती मूलतः सामाजिक व राजकीय क्षेत्रात तारूण्य अवस्थेपासून मानवी स्वभावाच्या संघर्षावर आधारीत मानसिक प्रक्रिया आहे. लोकांन मध्ये अन्याय अत्याचार विरोधात पाठीराखा म्हणून विश्वास निर्माण करणे ही नेतृत्वाची पहीली पायरी आहे .त्यामुळे नेता हा राजकीय व सामाजिक दृष्ट्या विलक्षण आत्मविश्वासाने भरलेला हवा तेव्हाच तो कार्यकर्ता घडवण्याची ताकद निर्माण करू शकतो. अशा नेत्याच्या अंगीभूत कर्तृत्वाला त्याच्या उद्याच्या कारणीमांसेत महत्त्वाचे स्थान आहे. विरोधकांशी  संघर्षाची धमक नसलेल्या हौशी नेत्यांत समाज नेतृत्व म्हणून कधीही पाहत नाही. नेतृत्व दिल्लीत अन् समर्थक गल्लीत म्हणजे एकाधिकारशाही समाजाला कालांतराने अंधारात नेऊन सोडते अशा परिस्थितीत लोकमान्य ध्येयासाठी अपेक्षित घाम गाळणार्या सामान्य कार्यकर्ताच्या अर्धवट स्वप्नांना मुर्तिस्वरूप देण्याचे काम नेतृत्वाचे असते अशा नेतृत्वामुळेच राजकारणातील राजकीय धंदेवाईक अथवा व्यक्तीगत लाभाचे राजकारण बंद होऊन समाजातील साचेबंदपणा मुक्त होतो. दुर्दैवाने अशा निखळ, त्याग, बलिदान, हक्क अधिकार हे तत्त्व असलेल्या नेतृत्वाच्या मार्गात नशीबी पडलेले राजकीय प्रदूषण साथ सोडून जाण्याऐवजी निरंतर विषवल्ली प्रमाणे भाडेतत्त्वावर फोफावत चालली आहे. अशा नेतृत्वाच्या राजकीय बलिदानानंतर देखील नशीबी व वाट्याला राजकारणात गावाच्या जत्रेतील नुरा कुस्तीची आठवण करून देणारे प्रसंग घडतात, कारण नुरा कुस्ती मध्ये दोन्ही पहेलवान ठरवूनच खेळतात तरीदेखील तळागाळातून, समाजाच्या मुलभूत अडचणींशी नाळ जोडलेली नेतृत्वाची प्रगती कधीही खुंटत नाही. 
*संघर्षाच्या अथांग सागरात मिळालेल्या यशामुळे धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमचे नेते आदरणीय श्यामदादा सनेर याचे मनापासून अभिनंदन*


Post a Comment

0 Comments