Header Ads Widget

*उघडा कान ऐका नीट...* *शेतकऱ्यांचे कैवारी, जाणता राजा चे वारसदार काय बोलता आहेत.* *-चंदन पवार*


शेतकऱ्यांना जेंव्हा जेंव्हा ह्या राजकारण्यांची गरज भासते त्या त्या वेळेस ही लोक शेतकऱ्यांना आपली पाठ दाखवतात आणि शेतकऱ्यांचे कल्याण करण्यापेक्षा शेतकरी अजून खड्ड्यात कसा जाईल याकडे बारकाईने लक्ष दिले जाते, आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आलेले स्टेटमेंट बघा, शेतकऱ्यांसाठी हे प्रीपेड कार्ड आणण्याचे षडयंत्र आखत आहेत, म्हणजे काय तर जो पर्यंत तुम्ही ते कार्ड रिचार्ज करीत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना वीज मिळणार नाही म्हणजेच काय आम्हाला आधी पैसे द्या मगच वीज वापरा, भले तुमची पिके जळून गेलीत तरी आम्हाला फिकीर नाही.

ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर यांनी सत्ता मिळवली आज त्याच शेतकऱ्यांना हे अंधाऱ्या कोठडीत लोटुन देण्याचे काम करीत आहेत, आज शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने संकट आले आहे अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अशा वेळेस अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना चिडविण्याचे काम पोट भरलेले आणि त्यांच्या 18व्या पिढीची सोय करून बसलेले राजकारणी करीत आहेत.

महोदय,तुमचे पगार तुम्ही 40 वेळा कुणालाही न जुमानता, काही मिनिटातच भरघोस वाढवून घेतले,त्यात  विरोधी पक्षालाही मजा वाटली, परंतु ज्या वेळेस शेतकर्‍यांना देण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही कायदे नियम तोटा या सर्व फालतू वल्गना करीत असतात, का यांना द्यायच्या वेळेसच तुम्हाला तोटा आठवितो का हो?  

शेतकरी आज देशाचा कणा आहे आपण त्यांना अन्नदाता बोलतो अशा लोकांना जर तुम्ही कुठल्याही सुविधा देत नसाल तर तुम्ही राजकारणी असल्याचा आम्हाला कुठलाही अभिमान नाही, किमान शेतकरी तुम्हाला खुर्चीवरून खाली ओढणार नाही तो दिवस जवळ येऊ देऊ नका कारण शेतकरी आधीच नुकसानीचे वैतागला आहे परिवाराचा डोलारा पुढे नेता नेता त्याला नाकीनऊ आले आहे आणि त्यात तुम्ही आगीत तेल ओतत असाल तर तुमचे काही खरे नाही, ज्या ज्या वेळेस तुम्हाला राजकारणात शेतकऱ्यांची आणि त्यांच्या मतदानाची गरज पडली त्या त्या वेळेस तुम्ही त्यांना प्रलोभने दिलीत आणि त्यांची मतं घेतलीस परंतु सत्ता हातात आल्यानंतर तुम्ही या पद्धतीने धोका देणे हे योग्य नाही जर तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचे होते तर तुम्ही निवडणुकीच्या वेळेस बोलायला हवे होते आम्ही असे कार्ड आणत आहोत मग शेतकऱ्यांने तुम्हाला त्याच वेळेस आसमान दाखविला असता आता हा सरळ सरळ धोका आहे.

आज अनेक इंडस्ट्रियल मालकांना तुम्ही हजारो रुपयाचे कर्ज माफ करतात त्यांना स्वस्तात जमीन देतात सबसिडी देतात त्या वेळेस तुम्हाला शेतकरी आठवत नाही का? की तो फक्त मतदाना पुरता असलेला एक माणूस असे समजतात, अरे शेतकरी जगला तर तुम्ही जगाल हे लक्षात असू द्या तुम्ही स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजतात तुमच्या काकांना लोक जाणता राजा समजतात असा तुमचा समज आहे, प्रीपेड कार्ड च्या वल्गना तुम्ही जाणता राजाच्या संमतीने करीत आहात का? आधी पैसे मगच वीज मिळणार या हिटलर वादी वाक्याने तुम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची मन दुखावली आहेत, निवडणुकीला जरी अजून वेळ असेल तरी शेतकरी हे विसरणार नाही आत्ताच तुम्ही शेतकऱ्यांची ताकद बघितली आहे, केंद्र सरकारला सुद्धा शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले आहे, जर केंद्रशासनाला झुकावे लागले तर तुम्ही तुमची पायरी ओळखावी, अशा पद्धतीने शेतकरी अजून खड्यात जाईल अश्या बोगस योजना आणण्यापेक्षा त्यांचा उत्कर्ष कसा होईल ते उभे कसे राहतील यासाठी योजना आणाव्यात, त्यांची नेहमी नेहमी कर्ज माफ करण्यापेक्षा त्यांच्यासाठी अशा योजना आणाव्यात त्यातून ते स्वतः कसे उभे राहतील हे बघावे.

त्यांना तुमच्याकडून भीक नको आहे परंतु मजबूरी आणि निसर्गाने केलेल्या अवकृपेमुळे त्यांना शेवटी तुमच्याकडे त्यांचा हक्क असूनही हात पसरावा लागतो, आंदोलने करावी लागतात ही चिंतेची बाब आहे, प्रीपेड कार्ड ची योजना म्हणजे शेतकऱ्यांना भिकारी बनविण्याची यंत्रणा आहे हे लक्षात घ्या आत्ताच अश्या षडयंत्राचा विरोध करा.

*©चंदन पवार*

Post a Comment

0 Comments