विधान परिषदेच्या कोल्हापूर, धुळे-नंदूरबार जागांसाठी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोल्हापूरमधून अपेक्षेप्रमाणेच गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांना तर धुळे-नंदुरबारमधून गौरव देवेंद्रलाल वाणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
या दोन्ही जागांवर भाजपने आपले उमेदवार आधीच जाहीर केल्याने कोल्हापुरातून पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा सामना भाजपचे अमल महाडिक यांच्याशी होणार आहे. सतेज पाटील यांनी मागील आठवडय़ातच आपला निवडणूक अर्ज सादर केला आहे. त्याचप्रमाणे धुळे-नंदुरबार येथे काँग्रेसच्या गौरव देवेंद्रलाल वाणी यांचा सामना अमरीश पटेल यांच्याशी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱया विधान परिषदेच्या यासह 6 जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होत असून 14 डिसेंबरला मतमोजणी होत आहे.

0 Comments