नरडाणा येथे शरद क्रिडा महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,मुंबई व ग्रामीण विकास क्रीडा मंडळ,नरडाणा यांच्या
संयुक्त विद्यमाने खान्देशस्तरीय चषक भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी सालाबाद प्रमाणे १८ डिसेंबर २०२१ रोजी खान्देशस्तरीय भव्य खो-खो स्पर्धेचे उदघाटन
माजी राष्ट्रीय खेळाडू संजय गिरासे,विर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त निलेश नेमाने,नरडाणा जिल्हा परिषदेचे गटाचे माजी सदस्य जितेंद्र सिसोदे,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे,शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कैलास ठाकरे, पिरन सिसोदे,जिजाबराव सिसोदे,लिलाधर सोनवणे,युवराज भामरे,एम.आर.जाधव,महेंद्र सिसोदे,आनंदा पाटील,विकास उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर वाघ,विकास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अविनाश कोतकर, पर्यवेक्षक आर.के.सिसोदे,जोगनिया सर,उपसरपंच प्रविण सोनवणे,बी.एम.पाटील,फिरोज पटेल,विकास विद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ.आनंद पवार,शरद वारुडे,राजेंद्र महाले,संतोष गुप्ता,विश्वास पाटील,प्रविण शिंदे,जगदीश ठाकरे, राजू पाटील हे उपस्थित होते.तसेच खान्देशस्तरीय चषक भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे केले आहे. या खो-खो स्पर्धेसाठी राजेंद्र सोनवणे,संकेत वाकडे,चेतन पाटील,मुन्ना सिसोदे,संदीप गिरासे,राहुल सपकाळे,प्रतिक जवराज,करण शिंदे, स्वप्निल शिरसाठ,राहुल पाटील,प्रविण शिंदे,वेदांत पाटील,सौरव सिसोदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे व डॉ. आनंद पवार यांनी आभार मानले आहे.



0 Comments