Header Ads Widget

*राजमाता आहिल्याबाई होळकरांनी दिली नगरपालीकेला सद्बुध्दी-राणीपुरा येथील दोन दुकानदारांना स्मारका समोर पर्यायी व्यवस्था...* *पिडीत तक्रार मागे का घेतात-एका वकीलाला पडलेला प्रश्न....*




*जनमत-*


*दोंडाईचा-* सध्या गावात विविध चौकात थोर-महात्मा-युग पुरुष यांचे स्मारके बाधण्यांचा सपाटा सुरू आहे. म्हणून ह्या स्मारकांच्या जवळ-समोर कोणीही संत्तर वर्षाचा काळखंड किंवा कमी कालावधी काढलेला व्यापारी-व्यवसायिक-दुकानदार-टपरीधारक जरी आला.तर त्याला आठ दिवसाच्या नोटीसीवर आपला इमला खाली करण्याची नोटीस नगरपालीके कडून देण्यात आली होती.मात्र आज न्यायालयात ह्या राणीपुरा व चैनीरोड येथील नगरपालीकेने अतिक्रमीत म्हटलेल्या दुकानदांराच्या तक्रारींवर कोर्टाने लावलेला स्टे- वर कामकाज होणार होते.मात्र नगरपालीकेने न्यायालयाबाहेरच  तक्रारधारासोबत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रपोजल ठेवले असता.फक्त राणीपुरा येथील दोघे तक्रारधाराने आपली तक्रार तथा गरज व नगरपालीकेच्या ताकतीचा विचार करत,आलेले प्रपोजल मान्य केले. म्हणजे मागील संत्तर वर्षापासून आपण राणीपुरा-होळी चौकात किराण्याचा व्यवसाय करत असल्याने राजमाता आहिल्याबाई होळकरांनीच नगरपालीका प्रशासनाला सद्बुद्धी देऊन आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली, अशी प्रतिक्रिया किराणा दुकान धारक गोविंद धनालाल चौधरी व सलून व्यवसायिक मोहन एकनाथ चित्ते यांनी दिली. मात्र एका वकीलाला पिडीतांनी दिलेली तक्रार मागे घेतल्याने प्रश्न पडत योग्य वाटले नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आज दिनांक १६ डिसेंबर रोजी दोंडाईचा न्यायालयात नगरपालीकीने विविध चौकात स्मारके बांधण्याचा मुद्द्यावर स्मारकांच्या जवळ-समोर असलेल्या व्यवसायिक-दुकानदार- टपरीधारक व वापरत नसलेल्या पडीत दुकनदारांना स्वतः हून अतिक्रमीत इमला काढून घेण्याची नोटीस बजावली होती.म्हणून काही व्यवसायिक न्यायालयात दाद मागण्यासाठी जात.न्यायालयाने सदर अतिक्रमण काढण्याचा विषयावर  सहा दिवसापुर्वी स्टे देत. आज त्यांच्या तक्रार अर्जावर कामकाज होणार होते. मात्र नगरपालीका प्रशासनाने सांमजस्याची भुमिका घेत, लगेच स्मारका समोर असलेली सार्वजनिक मुतारी तोडत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची शाश्वती दिली. म्हणून राणीपुरा-होळी चौकातील किराणा व्यवसायिक गोविंद चौधरी व सलून व्यवसायिक मोहन एकनाथ चित्ते यांनी कोर्टात दिलेली तक्रार मागे घेतली आहे.

मात्र तक्रार मागे घेतल्यावर एका वकीलाला प्रश्न पडत, बरोबर योग्य वाटले नाही. या परिस्थितीवर आम्ही पिडीत दुकानदार गोविंद चौधरी व मोहन चित्ते यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता.त्यांनी सांगितले की, सदर जागेवर आम्ही संत्तर वर्षे जुने दुकानदार व सलून चालक मागील सतरा ते अठरा वर्षापासुन व्यवसाय करत आहे. मात्र राजमाता आहिल्याबाई होळकर यांचे स्मारक आमच्या दुकानाजवळ येत असल्याने नगरपालीका प्रशासनाने आम्हाला आहे तो किराणा दुकान व सलुन दुकानाचा इमला स्वतः हुन काढुन घ्यायचा नोटीसा दिल्या होत्या. म्हणून आम्ही दोंडाईचा कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी अर्ज दिला. आज त्या अर्जावर सुनावणी होती.मात्र त्याअगोदर संबधीत चाणाक्ष नगरपालीका प्रशासनाने स्मारका समोरील सार्वजनिक मुतारी तोडत व आमचा दुकानांचा इमला तोडत पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आम्ही गावातील लहान व्यवसायिक लोक,सत्ताधारी पावरफुल नगरपालीका विरोधात न्यायालयात तक्रार टिकवून काय राजमहल किंवा तेरा कोटीची नगरपालीका इमारतीची मागणी थोडी करायची होती. कुटूंबाचे पोट चालवण्यासाठी मला माझी झोपडी वजा दुकानाची जागा नगरपालीका प्रशासनाने उपलब्ध करून दिली. तीच माझ्यासाठी ताजमहल बनविण्यासारखी गोष्ट आहे. रहिला कोर्टात केस टिकवून ठेवण्याचा प्रश्न, केस टिकवून ठेवली असती पण प्रशासनापुढे आम्ही गरिब व्यक्ती टिकलो नसतो. रोडावर आलो असतो.कोर्टात वेळ देणे,वकिलांची वेळोवेळी फी देणे,त्यात न्याय कधी मिळेल व निकाल हाती कधी पडेल याची शाश्वती नव्हती.वकील तर रोजच आपल्या बाजूने निकाल देत असतात. म्हणून सर्व परिस्थितीचा विचार करत,आर्थिकदृष्ट्या रोडावर येण्यापेक्षा प्रशासनाने रोडाच्या बाजूला म्हणजे स्मारकासमोर व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली. म्हणून त्यांचे आभार मानत. समजूतदार पणे आम्ही लेखी तक्रार मागे घेतली आहे, ऐवढेच त्यांनी शब्दांना पूर्णविराम देतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments