Header Ads Widget

*भूमी अभिलेख कार्यालय* *की पैसा वसूली केंद्र*



   भूमी अभिलेख कार्यालयास महसूल विभागाचा पाया म्हटला जातो या कार्यालयाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या प्रशासकीय, राजकोषीय, कायदेशीर उद्देश सफल करण्यासाठी या विभागाची निर्मिती करण्यात आली. या विभागाद्वारे जागा निश्चित करणे जागा मालकी दाखविणे, नकाशा नोंद ठेवणे अशी कामे येत असतात. परंतु या कामासाठी शासकीय पैशाच्या व्यतिरिक्त इतरत्र पैसे लुटण्याचे काम फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
 
    भूमी अभिलेख कार्यालय सर्व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठिकाण आहे .कर्ज घ्यायचे असेल, कर्ज फेडून बोजा उतरावयाचे असेल, जागा खरेदी करायची असेल, नावावर करायचे असेल अशा प्रत्येक कामासाठी भुमिअभिलेख कार्यालयाशी संबंध येतो. कर्ज काढले त्यालाही आणि कर्ज फेडले त्यालाही फेरफार नोंदी करण्यासाठी यावेच लागते. घर खरेदी असेल फेरफार नोंद घ्यावी या सर्व कामांसाठी सिटीसर्वे शी संबंध येत असतो परंतु ही कामे विहित नमुन्यात विहित, तारखेपर्यंत कराव्यात अशा सूचना असताना कधीही वेळेवर काम केले जात नाही. प्रत्येक कामासाठी सहा महिने, तीन महिने, एक वर्ष, तीन वर्ष असा मोठा कालावधी लागत आहे. पत्रकारांपासून  राजकीय पदाधिकाऱ्यां पर्यंत व्यापार्या पासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच भुमिअभिलेख च्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. प्रकरण जमा करा वर पाठवतो, धुळे पाठवतो अशा कारणांनी प्रकरण पेंडिंग ठेऊन त्रुटी काय असतील ते कधीच सांगितले जात नाही.  काम लवकर केले जात नाही असा भोंगळ कारभार सिटीसर्वे कार्यालयाच्या माध्यमातून सर्रास सुरू आहे .
 सिटीसर्वे च्या माध्यमातून नागरिकांना अनेक अडचणी सातत्याने येत आहेत. परंतु प्रचलित एक म्हन आहे "रोज मरे त्याला कोण रडे " त्रासाच्या फेर्‍यात अडकलेले लोक सिटीसर्वे च्या कर्मचारी अधिकाऱ्यांपुढे लोटांगण घालताना दिसत आहे. भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीप्रमाणे त्यांना लाचेच्या रुपात पैसे देऊन काम करून घेण्यात धन्यता मानत आहे. परंतु असे पैसे देऊन देखील  नागरिकांना काम करून दिली जात नाही. थोडक्यात जितके जास्त चक्रा मारतील तितकी जास्त रक्कम मिळवून खालपासून वरपर्यंत वाटप सुरळीत चालेल अशी भूमिका अभिलेख विभागाने घेतलेली दिसते. कारण की जनतेला  अडचणीच्या काळात सिटी सर्वे कार्यालयात जावे लागते. बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर भोजा उतरवणे आणि चढविणे हे सरळ सरळ सोपे काम देखील  सिटी सर्व्हे चा दप्तरात लवकर होत नाही. अधिकारी निर्ढावलेले , भ्रष्टाचाराने बरबटलेले कर्मचारी अशा असंख्य कारणाने त्रासलेले नागरिक पैसे देण्यात धन्यता मानत आहे. परंतु पैसे देऊन देखील काम केले जात नाही एवढेच नव्हे एखाद्याची प्रॉपर्टी मालमत्ता कार्डावरून उडवण्यात येत असते थोडक्यात सिटीसर्वे च्या दप्तरी प्रत्यक्षात जागा असताना प्रॉपर्टी दिसत नाही सोप्या शब्दात कंस मारुन प्रॉपर्टी कार्ड  वरून गायब करण्यात येते. कार्डावर  नाव घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे मागून त्रास दिला जातो. अशा त्रासाला कंटाळून दोंडाईचा शहरात भूमि अभिलेख तक्रार निवारण समिती गठित होते. आतापर्यंत पोलिस तक्रार निवारण समिती ऐकली होती, महिला तक्रार निवारण समिती, समस्या तक्रार निवारण समिती ऐकली होती. महाभयंकर त्रास भुमिअभिलेख खात्याचा झाला असल्यामुळे दोंडाईचा शहरात भुमि अभिलेख तक्रार निवारण समिती गठित केली जाते आणि जनतेवर होत असलेल्या अन्यायाबाबत सर्व प्रॉपर्टी धारक एकत्रित येऊन कायदेशीर संघटन करतात. 
         महसूल विभागाच्या अखत्यारित येणारे भूमी अभिलेख कार्यालय याचे स्वतंत्र संचालक पुणे येथे राहत असले तरी तरी मंत्री महोदयांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जनतेला त्रास देऊन पैसा गोळा करणे एवढेच एक मात्र काम सिटीसर्वे कार्यालयाच्या माध्यमातून होत असेल तर जनतेला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल याच्यातून क्रांती निर्माण होऊन आंदोलन उभे राहू शकते.  जनतेच्या समस्यांचे निराकरण लवकर न झाल्यास फार मोठे आंदोलन पेटून क्रांती निर्माण होऊ शकते यात शंका नाही. कारण की त्रास सहन करायची एक सीमा असते त्या सीमा चा अंत झाल्याचे चित्र धुळे जिल्ह्यात निर्माण झाले आहे. आम्ही सिटीसर्वे च्या जुलमी कारभाराविरुद्ध बातम्या छापल्या नंतर आज दिवसभरातून धुळे जिल्ह्यातून हजारो फोन खणखणले, अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि त्या निवारण्यासाठी दैनिक सच्ची पुकारणे पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. या सर्व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दैनिक सच्ची पुकार या वृत्तपत्राने समस्यांच्या विषयी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले आहे. दोंडाईचा शहरातील भूमी अभिलेख तक्रार निवारण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या वृत्तपत्रात मांडून होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करण्याची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा त्रास सामान्य जनतेचा कमी होत नाही तोपर्यंत आमची भूमिका ही आंदोलनाची राहणार आहे. काल
 सिटीसर्वे कार्यालयाच्या अधिकार्‍यांचा नंगानाच या सदराखाली आम्ही जनतेच्या समस्या मांडून वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली त्यावेळी अनेकांनी आमच्याशी संपर्क साधला अनेक कागदपत्रे हाती दिली. कशापद्धतीने सिटीसर्वे मध्ये वर्ष झाली प्रकरण पेंडिंग आहेत याचा लेखाजोखा आम्हाला सांगितला. सोसायटी रद्द झाल्यानंतर देखील मूळ मालकाचे  नाव लावण्या कामी अनेक समस्यांना सामोरे जाणे याविषयी देखील लोकांनी समस्या मांडल्या. यासर्व तक्रारींचे निवारण करण्यासाठी आम्ही भूमिका घेतली असून  सिटीसर्वे कार्यालयातून पैशांची मागणी होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. फक्त सरकारी फी मधेच कामे करावीत याच्या व्यतिरिक्त कोणी एक रुपया देऊ नये  असे आव्हान आम्ही जनतेला करीत आहोत.

          
   *राकेश प्रल्हाद पाटील*

Post a Comment

0 Comments