Header Ads Widget

नरडाणा येथे *I love Nardana*- (आय लव्ह नरडाणा) या सेल्फ पाॅइंट- सुशोभिकरणाचे उदघाटन माजी मंत्री आ जयकुमार रावळ यांच्या हस्ते



नरडाणा- नरडाणा येथे *I love Nardana*- (आय लव्ह नरडाणा) या सेल्फ पाॅइंट- सुशोभिकरणाचे उदघाटन माजी मंत्री आ जयकुमार रावळ यांच्या हस्ते करण्यात आले.   
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संजय सिसोदे अध्यक्ष एम डी सिसोदे महाविद्यालय हे होते.


     कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताने सिद्धार्थ सिसोदे यानी सांगीतले की आपण आता टी व्ही, ईनटरनेटच्या माध्यमातून बघतोच न्यूयार्क, लंडन, मुबई, शिर्ड़ी या अंतराष्ट्रीय ठिकाणी  सेल्फी पाॅइंट आहेत. जे नवे ते आपल्याला हवे म्हणून संजीवनी सिसोदे यांच्या जिल्हा परिषद निधीतून आपल्याही गावात सेल्फी पाॅइंट केला. आ जयकुमारभाऊ यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष तुषारदादा रंधे व उपाध्यक्ष कुसूमताई व कामराज निकम यांनी निधी दिल्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद. या जागेची शोभा वाढविण्यासाठी येथे ओपन जिम व उद्यान होणे गरजेचे आहे. याचबरोबर नरडाणा हे लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, रेल्वे  लाईनवर मोठा बोगदा व्हावा, नरडाणा गावातून जाणारा रस्ता बांधाकाम विभागाकडून दुरूस्त व्हावा, गावात छत्रपति शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासह गावाच्या अनेक मागण्या आहेत. यासाठी भाऊ मदत करतील हा विश्वास आहे.
      आ जयकुमार रावळांनी आपल्या भाषणात सागितले की सिद्धार्थ सिसोदे ने केलेलै काम खरोखर गावाच्या लौकीकात भर घालणारे आहे. अशाच नाविण्यपुर्ण कामाची युवापीढीकडून अपेक्षा आहे. आपण मंत्री पदाच्या काळात तालूक्याच्या सर्वांगीण विकाचाच प्रयत्न केले. रस्ते,  बुराई नदी बारमाही करून पाण्याचा प्रश्न सोडविला, लवकच जामफळ धरणाचे काम पुर्ण होवून तालुका सुजलाम सुफलाम होणार , नव्याने मुबई रेल्वे सुरु केली. पुणे रेल्वे पण सुरु करूअजूनही लांब पल्याच्या रेल्वे गाड्याना थांबा मिळवून देवू.
    लवकरच रेल्वे राज्यमंत्री दानवे साहेबाना नरडाणा रेल्वे स्टेशन वर भेटीसाठी घेवन येतो. आपण सर्व मागण्या मांडू. यानंतर पुन्हा एकदा कामाच कौतूक केले. 
      या कार्यक्रमाच सुत्रसंचलन प्रा शरद भामरे सरानी केले. तालुका अध्यक्ष आर जी खैरनार सर व मान्यवरानी समयोचित भाषण केली. यावेळी जि प सदस्य पंकज कदम, देविदास बोरसे, प स सदस्य राजेश पाटील, प्रवीण मोरे, मार्केट कमिटी सदस्य भाऊसाहेब शिरसाठ, नरडाणा सरपंच मन्साराम बोरसे, प्रशांत सिसोदे, धनराज गाढवे, छोटू महाराज, योगेश जोशी, व्यापारी प्रतिनिधि सुभाषशेट संकलेचा, राजूशेट बाफना, निंबादादा, जगदीश पवार, होळ सरपंच टी के पाटील, उपसरपंच भटू पाटील, मेलाणे सरपंच भटू बोरसे, धांदरने सरपंच रवींद्र गिरासे, पोलिस पाटील नारायण गिरासे, मयूर सिसोदे, अनिल सिसोदे,  रवींद्र बोरसे, डाबलीचे शाहनाभाऊ सोनवनणे, मधुकरशेठ, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments