देऊर बु. (ता. धुळे) (Dhule) येथील शेतकरी रवींद्र देवरे यांच्या शेतातील गोडाऊनमधून चोरट्यांनी कापूस (Cotton) चोरी करून नेल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटाबरोबरच चोरट्यांचा देखील संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून या संदर्भात रवींद्र देवरे यांनी स्थानिक पोलिस (Police) ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून आता पोलिस या चोरट्यांचा कशा पद्धतीने छडा लावतात याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जाळी तोडून ३५ क्विंटल कापूस नेला
मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कपाशीचे पीक चोरट्यांनी चोरून पोबारा केल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चांगला भाव मिळेल या आशेने गोडावूनमध्ये कापूस ठेवला होता. मात्र गोडाऊनची जाळी तोडून चोरट्यांनी जवळपास तीस ते पस्तीस क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे.
0 Comments