Header Ads Widget

*सोनगीर दोंडाईचा रस्त्याची दुरावस्था सुधारणार का*



      सोनगीर दोंडाईचा रस्ता सातत्याने खड्ड्याच्या फेर्यातच
 राहिला आहे. सोनगीर दोंडाईचा प्रवास करीत असताना गाडीच्या पार्ट सोबत माणसांचे पाठीचे मणके देखील मोकळे होत असतात. अशी परिस्थिती  रस्त्यातील खड्ड्यांमुळे निर्माण झाली आहे.सोनगीर  दोंडाईचा रस्ता हा पहिले राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. परंतु तो आता राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग थोडक्यात केंद्र सरकारकडे वर्ग झाल्याने केंद्र सरकार  सोनगीर दोंडाईचा रस्त्याची दुरावस्था कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का असा प्रश्न निर्माण होतो.
      धुळे, नंदुरबार लोकसभेचे दोन्ही खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्यानंतर ोनगीर दोंडाईचा रस्त्याला खड्ड्याच्या फेर्यातच वावरावे लागत असल्याने त्याचा त्रास रस्त्यावर वापरणार्‍या वाहनधारकांना होत आहे. अनेक वाहन खराब होतात सोनगीर ते दोंडाईचा 40 कि.मी.येण्यासाठी दीड दोन तासाचा कालावधी लागून जातो.इतकी महाभयानक दैनीय अवस्था झाली असताना भाजपचे आमदार, खासदार रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत की केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्राधिकरण महामार्गाचे अभियंत्यांकडे यांची किंमत या वजनच नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे.
     केंद्र सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री नुकतेच दोंडाईचा शहरात येऊन गेले आणि आता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे दोंडाईचा शहरात शिवस्मारक आणि महाराणा प्रताप यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आगमन होत आहे. मंत्री महोदय हेलिकॅप्टरने येत असले तरी जिल्ह्याचे अनेक अधिकारी हे बाय रोड येणार आहेत. असे असताना त्या रस्त्याची दुरावस्था सुधारण्याची गरज असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल, खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे दोन्ही माजी मंत्री रस्ता दुरुस्त करावा या समस्या कडे दुर्लक्ष करीत आहेत का? की यांचे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्राधिकरण महामार्गाच्या धुळे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दप्तरी किंमतच नाही की वजन नाही असा प्रश्न समस्त जनतेला भेडसावत आहे. एका सप्ताहात केंद्राचे दोन मंत्री येतात तरी देखील सोनगीर दोंडाईचा रस्त्याची डागडुजी होत नाही. रस्त्याचे सुधारत नाही इतकी निगरगट्ट खासदार-आमदार या धुळे जिल्ह्याला लाभले आहेत का?  जनाची नाही तर मनाची लाज वाटून दोंडाईचा शहरात राजपथ सारख्या भव्यदिव्य रस्त्याचे उद्घघाटन करताना सोनगीर दोंडाईचा रस्ता देखील सुधारावा अशी जनतेची मागणी होत आहे.

    *राकेश प्रल्हाद पाटील*

Post a Comment

0 Comments