Header Ads Widget

बेरोजगारांसाठी अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमचं भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

अमळनेर, प्रतिनिधी- सध्याच्या आधुनिक युगात शिक्षण मिळतं परंतु रोजगार संधी उपलब्ध होतं नाही. मुला-मुलींना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दि. 27/ 12/ 2021 वार- सोमवार रोजी  *मेळाव्याचे ठिकाण- माता बिजासनी अनुदानित आश्रम शाळा अंतुर्ली- रंजाणे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव* येथे  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
          सदरचा मेळावा अमळनेर मतदारसंघाचे आमदार मा.दादासो.श्री.अनिल भाईदास पाटील व जि.प.सदस्या मा.ताईसो.जयश्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाषराव पोपटराव पाटील  माजी सरपंच अंतुर्ली- रंजाणे, भाऊसो.प्राध्यापक नरेंद्र राजाराम सोनवणे (माजी प्राथ जि.अध्यक्ष ) अंतुर्ली, दादासो.सचिन बाळू पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर, श्री राजेश सुभाषराव पाटील अंतुर्ली यांच्या आयोजनाने व सौजन्याने हा मेळावा भरविला जात आहे.
           सदरच्या भव्य रोजगार मेळाव्यास मोठ्या प्रमाणात मुलां-मुलींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे.                                  या मेळाव्यात शैक्षणिक पात्रता- १०वी /१२ वी ग्रॅज्युएट /,आयटीआय ट्रेड / डिप्लोमा इंजीनियरिंग असणार आहे.तसेच नोंदणी व ट्रेनिंगसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ,बँक पासबुक ,व्हॅक्सिन सर्टिफिकेट ,शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट फोटो ४  ही कागदपत्रे आवश्यक राहतील असे आयोजकांनी नमुद केले आहे.

Post a Comment

0 Comments