नरडाणा--कला, वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव मा. संचालक राष्ट्रीय सेवा योजना जळगाव यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला ग्रामीण भागात ग्राहक हक्काबाबत जनजागृती व्हावी. ग्राहकांचे प्रबोधन व्हावे यावेळी नरडाणा एन. एस. एस मार्फत ऍक्सिस बँक शिरपूर चे श्री. हेमंत पवार संपर्क अधिकारी यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील यांनी त्यांचा सत्कार केला व अध्यक्ष पद भूषवले. हेमंत पवार सरांनी बँक विषयी ग्राहकांचे हक्क विविध योजना संबंधीत माहिती देऊन अमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते यात प्रा. ए. के पवार. प्रा. एम जे मासुळे डॉ. यू. जी. पाटील यांचा समावेश होता एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी डॉ. पी जी. सोनवणे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व आभार मानले त्यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

0 Comments