Header Ads Widget

म्‍हसदी फाटा येथील तीन दुकानांना अचानक आग , लाखोंचे नुकसान

धुळे : तालुक्‍यातील म्‍हसदी फाटा येथील तीन दुकानांना अचानक आग लागल्‍याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

यात मोटर वाइंडिंग, वाहनाचे स्पेअर पार्ट व रेडियमच्या दुकानास अचानक आग लागली.

धुळे तालुक्यातील नेल गावाजवळ असलेल्या म्हसदी फाटा येथे मोटर वाइंडिंग तसेच वाहनाचे स्पेअर पार्ट व रेडियमच्या दुकानास अचानक आग लागली. रविवार असल्याने दुकान बंद होते. परंतु दुकानांमधून आगीचे लोंढे व धूर बाहेर पडत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुकानात आग लागल्याचे समजले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू आहे.

लाखोचे नुकसान

दुकान बंद असल्यामुळे जीवित हानी टळली असली तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात मोटर वाइंडिंगसाठी लागणाऱ्या वायर्स तसेच वाहनांचे स्पेअर पार्ट जळून लाखोंचे नुकसान होण्याची दाट भिती व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments