🔴आमदार निधीतून काम मार्गी लागणार
अमळनेर(प्रतिनिधी)
तालुक्यातील अटाळे येथील १० लक्ष रुपयांच्या रस्त्या खडीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडले.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा या हेतूने मतदारसंघातील गावांना चांगल्या दर्जाचे रस्ते मिळावेत यासाठी आमदार अनिल पाटील जास्तीत जास्त निधी मतदारसंघासाठी देत असून,आमदार निधीतून १० लक्ष रूपयांचा निधी अटाळे येथील कामासाठी मंजूर करण्यात आलेला असून नदीपासून ते पिंपळे रस्त्यापर्यंत खडीकरण या माध्यमातून होणार आहे.
यावेळी शेतकी संघाचे मुख्य प्रशासक नाना हरी पाटील,पिंपळे सरपंच दिनेश पाटील,विजय पवार सर उपस्थित होते तसेच सरपंच गोपाल पाटील,उपसरपंच सौ रत्नाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य वना मिस्तरी, प्रवीण पाटील,अनिल पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील,पोलीस पाटील भीमसिंग पाटील,माजी सरपंच भरत पाटील,शिक्षक अनिल पाटील, मधुकर पाटील, दिनेश पाटील, हरिश्चंद्र पाटील,ननसिंग पाटील, युवराज पाटील, सुरेश पाटील, पंढरीनाथ मिस्तरी, किरण पाटील, कैलास पाटील, प्रभाकर पाटील,अशोक पाटील, जामसिंग पाटील, सुभाष पाटील, सुरसिंग पाटील, अशोक पाटील,नथ्थूपाटील, शत्रुघ्न पाटील, किशोर पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments