🔴अमळनेरातुन कार्यकर्ते होणार लाईव्ह सहभागी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहभागाचे आवाहन
अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवसा निमित्ताने मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याने अमळनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांना देखील ऑनलाइन सहभागी होता येणार आहे.
रविवार दि.12 डिसेंबर रोजी जी.एस.हायस्कुल अमळनेर येथे सकाळी 9 वाजता महाराष्ट्र विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या व्हर्च्युअल रॅली कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होणार आहे, अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्षा, नगरसेवक, बाजार समिती व शेतकी संघाचे मुख्य प्रशासक व प्रशासक मंडळ, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रा.पं. सदस्य तसेच वि.का.स.सोसायटी चेअरमन व संचालक मंडळ आदी सर्वांनी जी एस हायस्कुल येथे मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील वर्षी यशस्वी आयोजन
मागील वर्षी ८० व्या वाढदिवसाच्या रॅलीच यशस्वी आयोजन करण्यात आलेल होत, त्याची दखल खुद्द पवार साहेबांनी घेतलेली होती, यावर्षी देखील ८१ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मेहनत घेत असून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

0 Comments