धुळे - जिल्हा उपनिंबधक अभिजीत देशपांडे यांना २ लाखाची खंडणी मागत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणा-यास धुळे शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने खंडणी वसुल करतांना रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात जिल्हा उपनिंबधक अभिजीत विजय देशपंाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हस्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी देशपंाडे यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. हे काम करीत असतांना निवडणुकी एकुण १६ उमेदवारी अर्जापैकी छाननी प्रक्रीयेत एका अर्जावर हरकत आल्याने त्याबाबत नियमानुसार सुनावणी घेवून तो नियमात बसत नसल्याने एक अर्ज नामंजुर केला. सदरचा अर्ज नामंजुर करण्यासाठी देशपांडे यांनी १५ लाख रुपये घेतले असल्याचे म्हणत आनंद बाबुराव शिंदे याने २४ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. वारंवार धमकावले. २ लाख रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास धुळ्यात काम करु देणार नाही, १५ लाख घेतले म्हणून वरीष्ठांकडे व पोलिसांकडे खोटे तक्रारी अर्ज करुन कोर्टाच्या चकरा मारायला लावेल, तसेच ऍट्रोसिटीची किंवा पत्नी मुलीला बोलावून तुझ्यावर विनयभंगाची खोटी केस करुन तुला धुळ्यातून बदली करुन पाठवतो, नाही तर तुझा बेत पाहुन घेतो, असे वेळोवेळी धमकावत देशपांडे यांच्याकडून तडतोडी अंती १ लाख ४० हजार रुपये खंडणी देण्याचे सांगितले. वारंवार कार्यालयात येवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या वारंवारच्या त्रासाला कंटाळून अखेर उपनिंबधक देशपांडे यांनी थेट शहर पोलिसांकडे तक्रार केली. तसेच खंडणीचा पहिला हप्ता ३० हजार घेतांना आनंद शिंदे याला २७ डिसेंबर रोजी शहर पोलिसांकडून रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी आनंद शिंदे विरुध्द भादवि कलम ३८४, ३८८, ३८९, ५०४, ५०६, १८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार

0 Comments