Header Ads Widget

केंद्र सरकारच्या काळात झालेल्या महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा



अखिल भारतीय कॊग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनीयाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या काळात केंद्र सरकारच्या काळात झालेल्या महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा सुरू होती. या जनजागरण यात्रेचा समारोप दि.12 डिसेंबर रोजी जयपुर (राजस्थान) येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.तरी जिल्ह्यातील सर्व कॊग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी जयपुर येथील :महंगाई हटाव  रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कॊग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांनी केले आहे.  
अखिल भारतीय कॊग्रेस कमिटीच्यावतीने देशात भारतीय जनता पार्टीच्या राजवटीत गॅस,पेट्रोल, झिेल,खते-बियाणे,प्रेस्टीसाई, दाळी, तेल,या जिवनावश्यक वस्तूंच्या भावात अस्मानी वाढ झालेली आहे. तसेच युवक व बेरोजगारांना रोजगारापासून वंचित करणारे धोरणे या सरकारने राबविल्यामुळे देशात बेरोजगारी वाढलेली आहे. कृषी धोरणे चुकीची आखल्यामुळे शेतकर्‍यांचे व कृषी पुरक व्यवसाय संपुष्टात आलेले आहेत. या कारणास्तव अखिल भारतीय कॊग्रेस कमिटीच्यावतीने देशभर प्रत्येक जिल्ह्यात महागाईच्या विरोधात आंदोलने घेण्यात आली. महागाईच्या विरोधात दि.12 डिसेंबर रोजी रामलिला मैदान दिल्ली येथे महागाई रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. परंतू भारतीय  जनता पार्टीच्या सरकारने सदर परवानगी नाकारल्यामुळे सदर रॅली दिनांक 12 रोजी विद्याधर नगर,जयपुर (राजस्थान) येथे होणार आहे, तरी जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी तसेच पक्षाच्या सर्वच आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी दि.12 डिसेंबर रोजी विद्याधर नगर,जयपुर येथे महागाई हटाव महारॅलीत सहभागी व्हावे.
रॅलीत श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,गुलाम नबी आझाद, महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले,ना.अशोकराव चव्हाण, ना.बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, ना.वर्षा गायकवाड, ना.यशोमती ठाकूर,ना.अस्लम शेख ,  मुकूलजी वासनिक, अविनाशजी पों, एच.के.पाटील, के,सी.वेणूगोपाल, मल्लीकार्जून खर्गे, मुख्यमंत्री अशोकराव गेहलोत,सचिनजी पायलट, खा.रजनीताई पाटील,वामसी चांद रेड्डी,ना.विजय व्ेट्टीवार, ना.अमितजी देशमुख,मुज्जफर हुसेन,ना.सुनिल केंदार, ना.सतेज पाटील,ना.विश्वजीत कदम,ना.नितीन राऊत,बी.संदीपजी, सोनल पटेल,आशिष दुवाजी, कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, आ.प्रणितीताई शिंदे, नसीम खान,चंद्रकांत होंरे, शिवाजीराव मोघे, आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments