धुळे : तहसील अधिकाऱ्यांना अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्यांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अवैधपणे गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी कशा पद्धतीने वाढली आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत असून कुठल्याही प्रकारच्या कारवाईची भीती न बाळगता राजरोसपणे गौण खनिजाचे उत्खनन केले जात असल्याचेच या दृश्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्यांकडून तहसील अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर कारवाई करण्यासाठी पोहोचलेल्या तहसील अधिकाऱ्यांना दबाव तंत्राचा वापर करून देखील कारवाई न करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. अशा परिस्थितीत देखील तहसील अधिकारी सुदाम महाजन यांनी कुठल्याही दबावतंत्राला बळी न पडता कारवाई करण्याचा निर्धार करीत संबंधितांवर कारवाई केली आहे. यासंदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात संबंधित तहसील अधिकारी सुदाम महाजन यांनी संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
0 Comments