Header Ads Widget

आनलाईन फसवनुक: धुळे, पारोळा व चाळीसगावकरांना २९ लाखांचा गंडा



जळगाव---पारोळा तालुक्यातील व्यावसायिक संजय शर्मा यांना डेनिम हब लाईफ स्टाईल कंपनीची फ्रेंचाईजी देण्याच्या बहाण्याने पाच लाखात ऑनलाइन फसवणूक.

करणा-या साईराम बालाजी पाटील व परमेश बालाजी पाटील (दोन्ही रा.हैद्राबाद ) या भावंडांचा शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

पारोळा येथील व्यावसायिक संजय शर्मा यांना साईराम व परमेश पाटील यांनी संपर्क साधून डेनिम हब लाईफस्टाईल कंपनीची फ्रेंचाईजी देतो सांगून ऍडव्हान्स पाच लाख रुपयांची मागणी केली होती.त्यानुसार शर्मा यांनी त्यांना ऑनलाइन पाच लाख रूपये पाठविले होते.परंतु, दोघा भावंडांनी कुठलाही माल पाठविला नाही तर दुकानाचे फर्निचर करून दिले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी सायबर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यानुसार तत्काळ दखल घेण्यात आली.

त्यातच पोलीस तपासात या दोन्ही भावंडांनी मयूर मंडवाले (फैजपूर) यांची चार लाख, नारायण शिंपी (धुळे) यांची सात तर योगेश महाले (चाळीसगाव) यांचीही सात तसेच ओमप्रकाश व्यास (पालघर) यांची सहा लाख असे एकूण २९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची बाब उघड झाली होती.

दरम्यान, अटकेच्या भीतीमुळे दोन्ही भावंडांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी जिल्हा सरकारी वकील ऍड. केतन ढाके यांनी युक्तीवादा दरम्यान महत्वाची कागदपत्रे न्यायालयात सादर केली.

शनिवारी अटकपूर्व जामीन अर्जावर कामकाज होवून दोन्ही भावडांचा तपासाच्या दरम्यान आवश्यकता असल्याच्या कारणाने व खूप मोठी आर्थिक फसवणूक असल्याने त्यांचा केली अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.सरकार पक्षातर्फे ऍड. केतन ढाके यांनी काम पाहिले तर फिर्यादीकडून ऍड.अकिल ईस्माईल यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments