Header Ads Widget

आपण पूर्वाश्रमीचे पत्रकार असल्याने पत्रकारांच्या प्रश्नांची मला जाण आहे ज्येष्ठ पत्रकारांना पत्रकार सन्मान योजनेच्या लाभासाठी अटी-शर्ती सौम्य करीन माहिती महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे अकोला पत्रकार संघाला आश्वासन



फोटो कॅप्शन- माहिती महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा सत्कार करतांना मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा अकोला, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिर साहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर आदी.


अकोला  -   आपण पूर्वाश्रमीचे पत्रकार असल्यामुळे पत्रकारांचे प्रश्न आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे राज्यातील पत्रकारांचे शासनाकडे प्रलंबित  असलेले  प्रश्न समस्या निकाली काढण्यास आपण प्राधान्य देऊ.माध्यम क्षेत्रातून सेवानिवृत्त होणाऱ्यास जास्तीत जास्त जेष्ठ पत्रकारांना राज्य शासनाच्या पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी या योजनेच्या अटी व शर्ती सौम्य करण्याची गरज आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. मराठी  पत्रकार परिषद संलग्नीत अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने काल स्थानिक शासकिय विश्रामगृहावर माहिती महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बातचित करीत होते.

अकोला - बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारासंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे डॉ. दिलीप पांढरपट्टे हे निरीक्षक  आहेत व ते गेल्या काही दिवसापासून अकोल्यात मुक्कामी आहेत. राज्याचे माहिती महासंचालक असलेले डॉ. दिलीप पांढरपट्टे हे पहिल्यांदाच अकोला जिल्ह्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरअकोला जिल्हा पत्रकार संघाने डॉ. पांढरपट्टे यांच्या छोटेखानी सत्काराचे नियोजन केले होते. स्थानिक विश्रामगृहावर मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर , उपाध्यक्ष गजानन सोमानी, चिटणिस संजय खांडेकर, राजु उखळकर, उमेश अलोणे, जयेश जगड, मुकुंद देशमुख, दिपक देशपांडे, कमल शर्मा आदी पत्रकारांनी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला.  सत्कारानंतर डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाची अनौपचारीक बातचित केली. पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटीच्या मुद्यावर बोलतांना डॉ. पांढरपट्टे यांनी या योजनेच्या अटी व शर्ती सौम्य करण्याची मागणी राज्यभरातील पत्रकार करीत असल्याचे सांगितले. या  योजनेचे राज्यात केवळ १४८ जेष्ठ पत्रकार लाभार्थी आहेत. या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी व जास्तीत जास्त जेष्ठ पत्रकारांना या सन्मान योजनेचा लाभ होण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती  सौम्य करण्याची गरज आहे असे  पांढरपट्टे म्हणाले. स्वतंत्र व्यवसायी पत्रकारांना अधिस्विकृती पत्रीका मिळविण्यासाठी तिन वृत्तपत्रांचे कात्रणे व शिफारस पत्र गरजेचे आहे. नुतनीकरणाचे वेळेस हे वृत्तपत्रे  बदलली तरी अधिस्विकृती  पत्रीका रदद् होणार नाही अशी ग्वाही डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी बोलतांना दिली.  अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेने संघर्ष करून पत्रकार संरक्षण कायदा, पेन्शन योजना असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. पण त्यात काही त्रुटी व उणिवाही आहेत. त्याबाबत परिषदेचा पाठपुरावा सुरुच आहे. आज अकोला जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महासंचालकांनी अटी-शर्ती सौम्य करण्याचे बोलून दाखवले. त्यामुळे पत्रकारांनी त्यांचे आभारही मानले.

या छोटखानी सत्कार कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संजय खांडेकर यांनी केले. पत्रकार, गझलकार व नंतर आय.ए.एस. अधिकारी  असा  डॉ. दिलीप पांढरपट्टे  यांचा प्रवास यावेळी पत्रकार संजय खांडेकर यांनी उपस्थित पत्रकारांसमोर उलगडला. कार्यक्रमाला अकोला जिल्हा माहिती कार्यालयाचे  माहिती सहाय्यक सतीश बगमारे व सुनील टोमे उपस्थित होते.

******


 


Post a Comment

0 Comments