Header Ads Widget

अमळनेरच्या साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक डी. ए. धनगर सर यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर




अमळनेर- औरंगाबादच्या बोधी ट्री एज्युकेशनल  फाऊंडेशनतर्फे राज्यातील 34 शिक्षकांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्यात अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक ज्ञानेश्वर आधार धनगर (डी.ए. धनगर) यांचा समावेश आहे. हा पुरस्कार त्यांना 16 जानेवारी 22 रोजी एका सोहळ्यात देण्यात येणार असून या सोहळ्यास परिवारासह त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कारासाठी असलेले निकष हे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून निवड  करण्यात आली आहे.सरांच्या या क्षेत्रातील भरीव कार्यास न्याय मिळाल्याचे गौरवोद्गार प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर.डी. महाजन, संस्थाध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी काढले.

डी. ए. धनगर सरांनी आपल्या वीस-बावीस वर्षाच्या ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेले आहे. गणितासारखा अवघड विषय ते विद्यार्थ्यांना लीलया समजून देतात. त्यामुळे मोठा विद्यार्थी चाहता वर्ग त्यांचा आहे.  त्यांनी आजवर अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले आहेत त्यामुळे परिसरात उपक्रमशील शिक्षक म्हणून सर्वत्र सन्मान होतो. त्यांचे अनेक उपक्रम गणेशोत्सवात गणिती आरास, गणितात राबवलेला चालता-बोलता उपक्रम, कृतीयुक्त गणित, सेल्फी चा फंडा, पाढे म्हणा व व्हाट्सअप वर टाका, गणिती रांगोळी, त्रिमित हा कृत्यांसाठी सूत्रांकुर आधी अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. तसेच आर एम एस ए अंतर्गत आय आय टी मुंबईच्या वतीने झालेल्या प्रशिक्षणात ते प्रमाणपत्र धारक राज्यस्तरीय सुलभक आहेत.

     शैक्षणिक कामासोबतच त्यांचे सामाजिक काम सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. पर्यावरण समृद्धी साठी वृक्ष लागवड, कोरोना निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न, कोरोना काळात केलेली जनजागृती, सामाजिक सलोखा राखण्यासाठी केलेले प्रयत्न, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक, हागणदारी मुक्तीसाठी गावखेड्यात केलेले प्रयत्न, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे संचालक पदावर असताना केलेले काम, प्रशिक्षणात राबवलेली किंवा आर कोड हजेरी असे एक ना अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. त्यांना प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 


Post a Comment

0 Comments