Header Ads Widget

पत्रकार परिषदेचे नेते एस.एम. देशमूख यांच्या आवाहनास उस्फूर्त प्रतिसाद पत्रकार योगेश कोरडेंच्या उपचाराकरिता राज्यभरातून हात सरसावले



मुंबई - नागपूर येथील मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष  योगेश कोरडे हे पोटाच्या विकाराने आजारी असून  नागपूर येथे उपचार घेत आहेत. त्यांना या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने पत्रकारांचे नेते एस. एम. देशमूख यांनी आर्थिक मदतीचे आवाहन करताच राज्यभरातून अनेक हात सरसावले असून दोन दिवसात 51 हजार रुपये मदत जमा झाली आहे. योगेश कोरडे हे परिषदेचे खंदे कार्यकर्ते असून हाडाचे पत्रकार आहेत. सध्या ते अडचणीत आहेत. अशी वेळ कोणावरही येऊ शकते हे ध्यानात ठेऊन मदत झाली पाहिजे. यापूर्वीही परिषदेने संकटात असलेल्या अनेक पत्रकारांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले.

योगेश्वर कोरडे उपचारासाठी आणखी मदतीची आवश्यकता आहे तरी राज्यातील पत्रकार बांधव, जिल्हा तालुका संघ यांनी थेट योगेश कोरडे यांच्या अंकाऊटला मदत पाठवावी व सहकार्य करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व  मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.            

Yogesh nanaji Kordre, Union bank kalmeshwar

A.c.no.669202010003317

UBIN0566926

Phone pay Mob. 9767000200

यांचे हे बँक अंकाऊट नंबर व फोन पे नंबर आहे तरी यावर थेट मदत पाठवून, सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments