लोकचर्चा
धुळे--मागच्या आठवड्यात देशातील उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड मणिपूर आणि गोवा या पांच राज्यातील विधानसभा
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि देशांत कोरोनाची तिसरी लाटेने धडक दिली आणि राज्यात आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटाने रब्बी पिकांना फटका बसला या तीन घटना देशात घडल्या या तीनही घटना पैकी निवडणूक आयोगाने पांच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या
तारखा जाहीर करून कोरोनाचया तिस-या लाटेला आमंत्रण दिले जणू कोरोना आणि निवडणुका हातात हात
घालून बळींची संख्या आणि सरकार ची सत्व परीक्षा घेण्यासाठी सज्ज होत असल्याचे संकेत दिले आहेत एकीकडे सरकार जनतेला कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याची सक्ती करते दुसरीकडे सरकारच्या निवडणूक आयोगाला त्याचे गांभीर्य काय आहे याची जाणीव नाही दुसरया कोरोनाचया लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक परीणाम कारक ठरणार असल्याचे संकेत सरकार देते पण निवडणूक आयोग आणि नोकरशाही सरकारच्याच आदेशाला जूमानत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
मास न घातलेल्या लोकांना सरकारी कार्यालयांत प्रवेश नाही असे जिल्हाधिकारी यांचे स्पष्ट आदेशाचया पाट्या प्रवेशद्वारावरावर लावले असताना मात्र कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व अधिकारी यांनी मास्क लावल्याचे दिसून येत नाही सरकारी कार्यालयांत प्रवेश करणारे कोणीही मास्क लावल्याचे दिसून येत नव्हते मास्क आणि सनेटाइजर आणि लस घेतल्याची या विषयी कोणीही कर्मचारी तपासणी करतांना दिसत नाही असे चित्र सर्व सरकारी कार्यालयांत दिसून येते एकीकडे सरकार जनतेला कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याची सक्ती करत असताना मात्र कार्यालयात सरकारी कर्मचारी याचे पालन करतांना दिसत नसल्याने अशा परिस्थितीत सरकार निवडणूका कशा घेणार? सरकार स्वतःच्या च काढलेल्या आदेशाची पायमल्ली करतांना दिसत आहे सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येतो करोनाआणि सरकारची कोरोना नियम पाळण्याची जनतेवर सक्ती व निवडणूक आयोग या तीन पायांची शर्यत पाहण्याची जनतेच्या नशीबी आले आहे अशी ही तीन प्रकारची शर्यती जनतेचे तीन तेरा वाजलया शिवाय राहणार नाही?
दुसरीकडे राज्यात आलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी हंगामातील पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे खरीप हंगामातील पीकांचे नुकसान तर झालेच होते आता रब्बी हंगामातील शेतकरीचा हातातोंडाशी आलेला घास ही या अवकाळी पावसाने आणि गारपीटाने हिरावून घेतला आहे धुळे जिल्ह्यात या अवकाळी पावसाने आणि गारपीटाने रब्बी हंगामातील दादर ( ज्वारी) हरभरा गहू कांदा भुईसपाट झाले आहेत या अवकाळी पावसाने हजारो हेक्टर जमीनीवरील रब्बी पीके धोक्यात आली आहेत धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात आणि पिंपळनेर या भागातअवकाळी पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने तातडीने करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकर मिळाली या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे अशा बिकट परिस्थितीत राजकीय पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते यांनी शेतकरी या संकटातून कसा बाहेर पडेल या साठी सर्व ती मदत करण्याची तयारी केली पाहिजे अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा उभा राहील यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील नेते लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केले पाहिजेत नुसते पंचनामे केले म्हणजे आपली जबाबदारी संपली या भ्रमात न राहता आर्थिक मदत करावी सरकारी मदत ही अतिशय तुटपुंजी असते त्यावर विसंबून न राहता फोटोसेशन करणारया नेत्यांनी याचे भान ठेवावे या अवकाळी पावसाने आणि गारपीटाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात दिला आहे प्रत्येक नुकसान ग्रस्त कुटुंबाला दोन हजार रुपयांची मदत देऊन काही प्रमाणात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे या कामाबद्दल शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चया नेत्यांचे आभार मानलेच पाहिजे शेतकऱ्यांचा दुःखावर फुंकर घालण्याचे चांगले काम शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे नुसती कोरडी सहानुभूती न दाखविता प्रत्यक्ष आर्थिक मदत दिली याचे अनुकरण इतर राजकीय पक्षांनी करावे नुसती कोरडी सहानुभूती शेतकऱ्यांचे दुःख कमी करु शकत नाही शेतकऱ्यांची अवकाळी पावसाने आणि गारपीटाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी जी तत्परता तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांतील
नेत्यांनी दाखवली तशी तत्परता आर्थिक मदत करतांना दाखविली नाही शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस ने वैयक्तिक मदत केली तशी लोकप्रतिनिधी आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दाखवली असती तर बरे झाले असते नुकसानभरपाई शासन देईलच शासनाच्या पैशातून आपली पाठ थोपटून घेऊ नका आपणही समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवून स्वताच्या खिशातून आर्थिक मदत दिली असती तर? त्याबद्दल शेतकरी आपणास लाख मोलाचे मतदान आपल्या झोळीत टाकतो या उपकारांची परतफेड करण्याची हीच संधी होती अजूनही वेळ गेलेली नाही या संधीचे सोने करा आणि आपल्याला मतदान केलेल्या उपकाराची परतफेड करा या बाबतीत शिंदखेडा साक्री व शिरपूर चया आमदारांनी वैयक्तिक आर्थिक मदत केली असे अजूनही कळाले नाही किंवा वर्तमानपत्रात छापून न ही आले नसल्याचे दिसते मत मागताना मात्र क्षणाचाही विलंब लावत नाही मग आता मदत देण्याबाबत इतका विलंब कसला? आता शेतकऱ्यांवर वेळ आली तशी तुमच्या वर सुद्धा येऊ शकते काळ सुड उगवतो याचे भान असू दयावे
🌸 अरुण पाटील संपादक तोफ 🌸
मो नं ९४२०४४३९४४
0 Comments