अमळनेर- आज दि.12जानेवारी 2022 रोजी श्रमसाफल्य एज्युकेशन संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे युगपुरुष *स्वामी विवेकानंद* व राजमाता *जिजाऊ* जयंती ऑनलाइन वेबिनारचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डी आर ढगे यांनी अध्यक्षस्थान भूषविले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ.अस्मिता सरवैया यांनी केले. युगपुरुष *स्वामी विवेकानंद* व राजमाता *जिजाऊ* जयंती निमित्त महाविद्यालयातील दिव्यांनी किशोर पाटील, अश्विनी नबिलाल पवार, महिमा महेश सोनवणे, सुप्रिया निंबा बोरसे, विद्या आत्माराम पगारे, चंद्रकांत मंगळे, दक्षता अरुण पाटील, विशाखा संजय जोशी, तेजस किशोर पारधी, अश्विनी जाधव, अजय गायकवाड या विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली. प्रा डॉ.भरत खंडागळे यांनी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या महिलांनी पुढाकार घेऊन कार्य केले त्या सर्वांच्या कार्या उल्लेख खंडागळे सरांनी तसेच जय जवान जय किसान चा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून आपल्या मनोगता ची सांगता केली. प्रा. डॉ.श्वेता वैद्य यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्याचा उल्लेख करून मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद यांनी जगाला उद्देशून केलेल्या भाषणात भाऊ आणि बहीण हा उल्लेख करून भारतीय जनतेचा एकमेकां बाबतचा आदर स्पष्ट केला. अनेक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रा डी आर ढगे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवन पट विद्यार्थ्यां समोर मांडला. विद्यार्थ्यांनी, आयोजकांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला या सर्वांचे आभार व्यक्त करून आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ अस्मिता सरवैया, सूत्रसंचालन निकिता वरोळे या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन सुप्रिया निंबा बोरसे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अस्मिता सरवैया, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय कुमार वाघमारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अनिता खेडकर, प्रा. चंद्रशेखर बोरसे, प्रा. डॉ. भरत खंडागळे, प्रा डॉ जगदीश सोनवणे, प्रा डॉ श्वेता वैद्य,प्रा डॉ सागरराज चव्हाण व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकयांचे सहकार्य लाभले.
0 Comments