*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील नंदुरबार चौफुलीवरील बजाज शोरूम पुढे काल रात्री डॉक्टरची टाटा अल्ट्रोज व बारा चक्का ट्रकची समोरासमोर कटबाजीने टक्कर होत,डॉक्टरसह दोन जण किरकोळ जखमी झाले असुन, त्यात दोघांच्याही गाड्यांचे जबरदस्त नुकसान झाले आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला उशीरापर्यंत मोटार अपघात खाली गुन्हा दाखल करायचे काम सुरू होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गावातील खान्देश मेडीकल जवळीक समर्थ क्लिनिकचे डॉ. सचीन आबा पाटील हे नातेवाईकांना घेऊन आपल्या टाटा अल्ट्रोज गाडी क्रमांक एम.एच.३९-ए.बी.-८१५७ ने दोंडाईचाकडे येत असताना नंदुरबार चौफुलीवरील बजाज शोरूम पुढे अचानक धुळेकडून नंदुरबारला जाणारी बारा चाकांची ट्रक एम.एच.१८-बी.जे.-८५०८ ने खड्डे चुकविण्याच्या कटबाजीने टाटा अल्ट्रोज गाडीला अपघात केला. अपघातात डॉक्टर सचीन पाटील व नातेवाईक अधिकार देवरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पण ट्रक व टाटा अल्ट्रोज गाडीचे टायर फुटत बाँडीचे जबरदस्त नुकसान झाले आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्थानकात उशीरापर्यंत मोटार अपघात कायद्याखाली गुन्हा दाखल करायचे काम सुरू होते.

0 Comments