शिंदखेडा तालुक्यात काल झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड असे नुकसान केले असून याचे सरसकट पंचनामे करून यादया ग्रामसभा घेवून त्याठिकाणी वाचून दाखवाव्यात अशा सूचना माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल यांनी दिल्या आहेत.
आज माजी मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल यांनी वरपाडे, अमळथे, विरदेल, आणि कुरूकवाडे येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अधिका-यांना सूचना दिल्या .
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस.डी.मालपूरे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, नायब तहसिलदार मोरे, विस्तार अधिकारी संतोष सावकारे, मंडळाधिकारी श्री कोळी, कृषी सहाय्यक देवरे, जि.प.सदस्य डी.आर.पाटील, पं.स.चे उपसभापती नारायणसिंग गिरासे, अरूण पाटील, पं.स.सदस्य दिपक मोरे, प्रविण मोरे, राजेश पाटील, भरत पवार, रणजित गिरासे, दुल्लभ सोनवणे, बाजार समितीचे उपसभापती अनिल गायकवाड, सुनिल पवार, भैया पवार, उदेसिंग गिरासे, रामचंद्र पवार, दगा पवार, हिम्मतसिंग गिरासे, वरपाडे उपसरपंच चंद्रकांत पवार, बापू गोसावी, अनिल जाधव, संजय चौधरी, दिपक पवार, नंदू पवार, कुरूकवाडे पोलिस पाटील प्रकाश पाटील, मनोज पाटील, राजेंद्र जाधव, जतनसिंग गिरासे, मनोज गिरास, युवराज भिल, रविंद्र माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.जयकुमार रावल म्हणाले की, गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचे संकट, खरीपात दुबार पेरणीचे संकट शेतक-यांवर कोसळले होते, पाऊस ब-यापैकी झाल्याने बळीराजाची मदार रब्बी हंगामावर होती, पंरतू पीके बहरली असतांना अचानक अस्मानी संकट कोसळून शेतक-यांना उध्दवस्त करण्याचे काम यामुळे झाले आहे, त्यामुळे आता भरीव मदतीची अपेक्षा असून कोरोना काळात देखील दमडीची मदत केलेल्या या सरकारने किमान आता तरी केवळ गप्पा न मारता शेतक-यांना भरीव अशी मदत करावी अशी अपेक्ष आहे, जर शासनाने आता मदत केली नाही तर मोर्चे काढू आंदोलने करू पण माझ्या शेतक-यांना भरीव मदत मिळवून देवू अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ.रावल यांनी देत ब-याचवेळा नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहून जातात त्यामुळे सरसकट पंचनामे करून यादया ग्रामसभा घेवून त्याठिकाणी वाचून दाखवाव्यात त्यानंतरच शासनाला अहवाल पाठवावा अशा सूचना देखील आ.जयकुमार रावल यांनी कृषी, महसल आणि ग्रामविकास विभागाला केल्या आहेत.


0 Comments