Header Ads Widget

वारूळ व डांगुर्णे ता.शिंदखेडा गावाची भेंडी लंडन च्या बाजारात..... कृषि विभागाचा पुढाकार!



धुळे (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत  " *विकेल ते पिकेल* "  ही योजना सुरू केलेली आहे.
         या योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील वारूळ व डांगुर्णे या गावातील 37 शेतकऱ्यांनी भेंडी या पिकाची लागवड केली आहे . उत्पादित केलेल्या भेंडीला  देशातच नव्हे तर परदेशातही मागणी वाढली आहे. विदेशात भेंडीला जास्त मागणी आहे. आतापर्यंत 750 क्विंटल भेंडीची युरोपियन देशात प्रामुख्याने लंडन येथे  निर्यात झाली आहे. आणखी 1800 क्विंटल भेंडीची निर्यात करण्यात येणार आहे.
       " *विकेल ते पिकेल"* या योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील वारुड व डांगुर्णे गावातील 37 शेतकऱ्यांनी 12 हेक्‍टरवर लागवड केली आहे भेंडीची लागवड सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात केलेले आहे भेंडीच्या निर्यातीसाठी मुंबई येथील थ्री सर्कल एक्सपोर्ट कंपनीमार्फत कृषी विभागाच्या माध्यमातून करार करण्यात आला आहे. सदर कंपनीने भेंडीला 30 रुपये प्रति किलो प्रमाणे भाव देण्याचा करार केला आहे. त्या प्रमाणे भाव देत आहेत. 
          भेंडी पिकाचे उत्पादन शेतकरी सेंद्रिय पद्धतीने करतात.त्या साठी जिवामृत व निंबोळी अर्क याचा वापर करतात.  साधारण 40 ते 45 तोडे भेंडी पिकाचे होतात उत्पादित केलेली भेंडी ची शेतकरी सकाळी आठ ते दुपारी दोन च्या दरम्यान प्रतवारी करतात त्यानुसार पॅकिंग करतात हि पॅकिंग केलेली भेंडी कंपनीच्या वाहनाद्वारे निर्यातीसाठी मुंबई येथे त्याचे युनिट ला पाठवले जातात. आणखी 1800 क्विंटल भेंडी निर्यात होणार असल्याचे शेतकरी दत्तात्रय दोरिक, वारूळ व गोरख पाटील, डांगुर्णे यांनी सांगितले. दोन्ही गावातील शेतकऱ्यांना खर्च वजा जाता एकरी 75 ते 80 हजार निव्वळ नफा मिळत आहे.
     सदर शेतकऱ्यांना शिंदखेडा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री विनय बोरसे, मंडळ कृषी अधिकारी नवनाथ साबळे, लालन राजपूत, कृषी पर्यवेक्षक भटू पाटील ,पी.बी.पाटील, भरत अहिरराव, कृषी सहाय्यक कांतीलाल साळुंके , शुभांगी जाधव  यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे यापूर्वीही कृषी विभागामार्फत विकेल ते पिकेल या योजनेमध्ये दादर उन्हाळी तीळ आदी पिकांचे उत्पादन घेऊन विक्री करण्यात आलेले आहे.


ठंड आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि मराठी पत्रकार परिषद मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

https://kutumbapp.page.link/SMskN64TYGp93Bve6

Post a Comment

0 Comments