~~~~~~~~~~~
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड दर वर्षी दि ३ जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीआई फूले यांच्या जयंती पासून ते १२जानेवारी जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त दशरात्रोस्तव सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहात शिव विचारांचा जागर केला जातो त्या निमित्ताने धुळे शहरात शिवतिर्थ संतोषी माता मंदिर चौक धुळे येथे शिवक्रांती शिव साहित्य प्रसार अभियान राबविण्यात येत आहे. याठिकाणी आज सकाळी धुळे शहराचे मा.आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती बाबसो. राजवर्धनजी कदमबांडे यांनी सदिच्छा भेट देऊन विक्री होत असलेल्या शिवसाहित्याची पहाणी केली.या अभियानात शिवसाहित्य स्टाँल व विक्रीसाठी शिवकालीन इतिहासावर आधारित अभ्यासपूर्ण ऐतिहासिक पुस्तके व पाँलीमार्बल मधील आकर्षक व टिकाऊ दर्जेदार शिव,शाहु फुले, आंबेडकर यांच्या मुर्ती वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सदिच्छा भेटी प्रसंगी मा.बाबासाहेबांसोबत मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिग्रेडचे अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

0 Comments