Header Ads Widget

मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदानात 100% वाढ करावी राष्ट्र सेवा दल साक्री रोड शाखेची निवेदनाद्वारे मागणी



 

धुळे- केंद्रीय अर्थसंकल्प 22-23 या अंदाजपत्रकात ‘प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण’ या नावाने सुरु होत असलेल्या योजनेत अनुदानाची तरतूद केलेली दिसून येत नाही. उलट कपातच झालेली आहे ही गंभीर बाब आहे. बहुजन कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील बहुसंख्य मुलं या योजनेमुळे टिकून आहेत मात्र अनुदानात कपात झाल्याने ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाण्याचा धोका आहे म्हणून प्रधानमंत्र्यांच्या नावे सुरु होत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेस 100% अनुदानाची तरतुद करण्यात यावी अशी मागणी राष्ट्र सेवा दल साक्री रोड, धुळे शाखेच्या वतीने आज दि. 23 रोजी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धुळे यांच्यामार्फत केंद्रीय अर्थमंत्री मा. ना. श्रीमती निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे. म.उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी निवेदन स्विकारले.  देशातील शाळा-शाळांमधून मुला-मुलींची उपस्थिती वाढावी गळती थांबावी, त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी भारत सरकारने एम.डी.एम. मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली होती. ही योजना आता ‘प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण’ या नावाने सुरु होत आहे. म. जिल्हाधिकारी धुळे यांच्या मार्फत केंद्रीय अर्थमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर मोगलाई, कुमारनगर, भिमनगर, यशवंतनगर, विविध कॉलन्यांसह साक्री रोड परिसरातील राष्ट्र सेवा दल सैनिक व नागरीकांच्या सह्या आहेत.



 


Post a Comment

0 Comments