म. दि. सिसोदे कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नरडाणा महाविद्यालयात शहीद दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ समाधान पाटील हे होते. प्रमुख वक्ते इतिहास विभागाचे प्रा. डी. ए. शिरसाठ व कॉमर्स विभागाचे प्रा. एस. आर सोनार सर होते. सिरसाठ यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य काळातील शहिदांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे वीर मरण चीर स्मरणात असावे. देशासाठी केलेले मोलाचे बलिदान मातृभूमीच्या कामी आले. त्याने देशप्रेम उजागर होते असे सांगितले, सोनार सर यांनी भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. समाधान पाटील यांनी शहीद दिवसा बद्दल माहिती दिली. कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नरडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप सोनवणे यांनी केले व आभार प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी व्यक्त केले. महाविद्यालचे वरिष्ट प्राध्यापक एन. वाय खैरनार. यु. जी. पाटील व महाविद्यालयाचे प्राध्यापक यावेळी उपस्थितीत होते.

0 Comments