धुळे- ‘काम अगदीच तकलादू चालू (ग) चालू तरीही, गटारीने पंधरवाड्यापासून नागरीकांची वाट अडवली’’ या शिर्षकाखाली विद्यावर्धिनी परिसरातील मलेरिया ऑफीस ते साक्री रोडवरील रस्त्यावर गटारी कामाच्या साचलेल्या ढिगाऱ्याच्या विलंबाविषयी राष्ट्रसेवादल साक्री रोड शाखेच्या वतीने दिलेल्या ईशाऱ्याचे वृत्तपत्र व समाज माध्यमावर झळकलेल्या वृत्ताची अवघ्या काही तासातच महापालिकेने दखल घेतली. ‘देर आए, दुरुस्त आए’ अशा पद्धतीने का होईना महापालिकेचे आरोग्य निरीक्षक रुपेश पवार, त्यांचे सहकारी संदीप वाघ यांनी जे.सी.बी. व ट्रॅक्टर मागवून स्वत:च्या देखरेखीखाली संपूर्ण ढिगारा उचलला व रस्ता मोकळा करून दिला. त्याबद्दल राष्ट्र सेवा दल साक्री रोड शाखेच्या वतीने धुळे महापालिका व परिसरातील नगरसेविका सौ. सुशिलाताई ईशी यांचे आभार मानण्यात आले. परिसरातील अनेक नागरिकांनीही भ्रमणध्वनी द्वारे- सेवादल सैनिकांच्या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले. परिसरातील नागरीकांनीही आता नागरी समस्यांबाबत सतर्क व जागृत राहून सनदशिर मार्गाने आपली लढाई आपणच लढली पाहिजे, साक्री रोड राष्ट्र सेवा दल शाखा आपल्या सोबत आहेच अशी ग्वाही राष्ट्र सेवा दल साक्री रोड शाखेच्या देण्यात आली आहे.

0 Comments