Header Ads Widget

*स्व. पदमाराजे कदमबांडेंच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त..* *मराठा समाजाच्या वतीने शिवभोजन वाटप...!*



धुळे :- लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नात व छत्रपति राजाराम महाराज यांच्या राजकन्या तसेच धुळ्याचे मा.आमदार राजवर्धन कदमबांडेंच्या मातोश्री. स्व.छत्रपती श्रीमंत पदमाराजे कदमबांडे  यांच्या २५ व्या पुण्यस्मरणार्थ आज दि.२१ रोजी धुळे बस स्थानकासमोरील शिवभोजन येथे सकाळी ११ वाजता गोर गरिब गरजवंतांना मोफत शिवभोजन वाटप करण्यात आले.सर्वप्रथम  मातोश्री.स्व. पदमाराजे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या पवित्र पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा समाजाच्यावतीने धुळ्याचे मा.नगरसेवक तथा मराठा क्रांती मोर्चाचे  समन्वयक श्री. संदीप भैय्या पाटोळे यांनी केले होते. या प्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठनेते सर्वश्री.सुधाकर दादा बेंद्रे,श्री.अशोककाका पाटोळे, उद्योजक योगीराज मराठे,गव्ह. काँन्ट्रँक्टर प्रकाशदादा पाटील, पंच मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे ,मराठा क्रांती मोर्चाचे सचिव निंबा मराठे,कार्याध्यक्ष प्रदिप जाधव, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम,सहखजिणदार विरेंद्र मोरे,दिपक रौंदळ, मनोज ढवळे, जितेंद्र ठाकरे,ललित कोरके,संजय बगदे,विनोद जगताप, राहुल क्षिरसागर,बबलू वाणी,शाम निरगुडे, देविदास पवार, दिनेश चव्हाण, किरण पवार, रूपेश भोकरे, बाळू गायकवाड, गोलू वाघ, संदीप सुर्यवंशी, ,हेमंत कदम, प्रदिप सुर्यवंशी, रविंद्र शिंदे,बंटी देवकर, अमर फरताडे, आदींसह बहुसंख्य मराठा समाज बांधव आवर्जून उपस्थित होते.
 *पुढील वर्षी स्व. पदमाराजे कदमबांडे यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे आजोबा छत्रपती शाहू महाराज,वडील छ.राजाराम महाराज  आई छ.ताराराणी महाराज या करवीर राजघराण्या पासून  तर राजकन्या स्व.पदमराजे रघुजीराजे कदमबांडे यांच्या तोरखेडा संस्थानाला संपूर्ण  उजाळा देण्यासाठी ऐतिहासिक विषयावर एक दिवसीय व्याख्यामालेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समाजधुरीनांनी मनोदय व्यक्त केला.*

Post a Comment

0 Comments