Header Ads Widget

*एल.आय.सी.च्या तरूण डेव्हलपमेंट अधिकाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या....* *गावात सहा ते सात दिवसातील तिसरी घटना-समाजमन सुन्न...* *अंतविधीसाठी सुवर्णकार समाजासह,एल.आय.सी व मित्रपरिवार ऐकवटला....*





*जनमत-*

*दोंडाईचा-* येथील पटेल कॉलनी व जुन्या सोनार गल्लीत राहणारे एल‌आय.सी.कंपनीचे तरूण डेव्हलपमेंट (विकास) अधिकारी श्री अतुल दिलीप सोनार (वय-३८) यांनी काल दिनांक २० जुन रोजी रात्री अंदाजीत वेळ आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या सोनार गल्लीतील जुन्या घरी सिलींग फॅनला रुमालच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.गावात मागील सहा ते सात दिवसात एक सिव्हिल इंजिनियरिंगची विद्यार्थींनी, एक जिल्हा परिषद शिक्षक व काल एक एल.आय.सीचे डेव्हलपमेंट अधिकाऱ्याने आत्महत्या  करण्याची घटना झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

येथील पटेल कॉलनीतील रहिवासी  व आपल्या स्वभाव, शिक्षण व देह बोलतुन सर्वाना जवळ करुन हवेहवेसे वाटणारे अतुलभाऊ सोनार हे अतंत्य कमी वयात एल.आय.सी.सारख्या जगविख्यात जीवन विमा पॉलिसी कंपनीत डेव्हलपमेंट अधिकारी अर्थात विकास अधिकारी ह्या पदावर‌ कार्यरत होते. त्यांनी आजपर्यंत अनेक विमा एंजट आपल्या हाताखाली तयार करत,मोठ्या पदावर पोहचविले होते. कधीही कोणालाही हसतमुखाने चांगलाच सल्ला दिला असेल,म्हणून ते कमी वेळात गावात परिचयाचे झाले होते. आत्महत्या सारखा विचार ते आपल्या अंगी ते येऊ देतील असे कोणालाही वाटत नव्हते.काल त्यांच्या घरी सासरकडील मंडळीही आलेली होती. तसेच घरी आईही उपस्थित होती.मात्र संध्याकाळी सात वाजता ते आपल्या सोनार गल्लीतील जुन्या घरी आले. आठ ते साठे नऊ वाजता चुलत भाऊ बंटी सोनार यांना बातमी मिळाली.त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत,अतुल यास उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.मात्र वैधकीय अधिकारी श्री काटे यांनी मयत घोषीत केले.सकाळी शवविच्छेदन झाल्यावर शव ताब्यात दिल्यानंतर अकरा वाजता अंतविधीला सुवर्णकार समाज,एल.आय‌सी.परिवार व मित्रपरिवार,पटेल कॉलनी रहिवासी मोठ्या संख्येने जमलेले होते.यावेळी सर्वचजण तरुण अतुलच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करत होते. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

गावात आज मागील सहा ते दिवसात एक सिव्हिल इंजिनियरिंगची विद्यार्थींनी, एक जिल्हा परिषद शिक्षक व एक एल.आय.सी.चे डेव्हलपमेंट अधिकारी यांच्या आत्महत्येच्या घटनेने शहर शोकाकुल होत,समाजमन सुन्न झाले आहे. मयत अतुल सोनार यांच्या मागे आई,पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments