Header Ads Widget

कलमाडी अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात योगदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न



     शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील माता तुळजाभवानी बहुउद्देशिय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात योगदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
          यावेळी कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या पटांगणावर केले असता या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.
श्री एस.ए. कदम होते व 
प्रमुख पाहुणे: संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष आबासो. श्री.जे.बी.पाटील, व 
मुंबई येथील भारती बिजली कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आदरणीय,भाऊसाहेब श्री.गोकूळ धोंडू पाटील,ताईसो.सौ लताबाई गोकुळ झालसे (कलमाडी),खलाणे गटातील जि.प. सदस्य व आजी खलाणे गट जि.प. सदस्या ताईसो.सौ.सोनाली पंकज कदम यांचे प्रतिनिधित्व म्हणून भाऊसो.पंकजभाऊ शिवाजी  कदम व ग्रा.पं.कलमाडी उपसरपंच मोठाभाऊ श्री.भाईदास दगाजी पाटील  तसेच दादासो.श्री. धोंडू वामन झालसे  या सर्वांच्या हस्ते प्रथमतः सरस्वती मातेच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
           यावेळी  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. ए. कदम यांनी प्रास्ताविकात म्हटले की, 
योग म्हणजे काय?  
    'योग' हा शब्द  युज या धातूपासून तयार झालेला आहे To Use म्हणजे जोडणे,शरीर व मन जोडणे म्हणजे योग. "योग म्हणजे सुखी व समृध्द जीवनाचा प्रभावी राजमार्ग होय."
१]शरीर व मन संतुलित करणे म्हणजे योग .
२]"समत्वं योग उच्चते" या अर्थाने आत्मशक्तीचे परमात्म्यातशक्तीत विलीनीकरण करणे म्हणजे खरा योग होय.
 ३] महर्षी पतंजली म्हणतात की," योग: चित्तवृत्ती: निरोध:" चित्ताच्या वृत्तीचा विरोध करणे म्हणजेच योग.
४]शरीर व मनावर योग्य संस्कार करून शरीर व मन शुध्द  करून जीवनाची वाटचाल करणे म्हणजे योग होय.इ.शरीर संवर्धनाविषयीचे ऋषीमुनी व रामदेव बाबांचे उदाहरण देवून महत्व पटवून दिलेत. तद्नंतर
      योगशिक्षक:श्री.सी.जी.वारूडे सर
श्री.जे.डी.चव्हाण सर यांनी योग साधना व प्रार्थना योगासन,प्राणायाम,कपालभाती  ध्यान,संकल्प ,प्रतिज्ञा वाचन इ.विषयीची माहिती देवून प्रात्यक्षिक घेण्यात आली.
       या योगसाधनेने विद्यार्थीवर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, मान्यवर व गावातील मंडळी यांनी ही  सहभाग घेतला. व
       या कार्यक्रमाचे औचित्य साधून सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब गोंकूळ धोंडू झालसे  व सेवा भावी त्यांच्या पत्नी सौ.ताईसो लताबाई गोकुळ झालसे या दोन्ही दान देणाऱ्या दात्यांचा नामोल्लेख  विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय, 
श्री एस.ए.कदम यांनी सांगितले की  दरवर्षी मोफत लेखन साहित्य वाटप करणारे दाते यांचा नामोल्लेख करणे महत्त्वाचे होय, तर आपल्या कलमाडी गावातील जन्मभूमी पुत्र व कर्मभूमी मुंबई असे आदरणीय,भाऊसाहेब श्री.गोकुळ धोंडू झालसे (भारती बिजली कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी मुंबई)यांनी गेल्या ८ वर्षापासून कलमाडी येथील जि.प.केंद्र शाळेतील इयत्ता १ली ते ४थी व अगस्तमुनी माध्य. विद्यालय कलमाडी येथील इयत्ता ५वी ते इयत्ता १०वी या सर्व विद्यार्थ्यांना मोफत  वह्या,दप्तर व लेखन साहित्य दरवर्षीप्रमाणे योग दिनाच्या कार्यक्रमाचे हे लेखन साहित्य जवळ-जवळ ४५०००/हजार रुपयांपर्यंतचे लेखन साहित्य मोफत वाटप करतात या मागचा  त्याचा एकच दृष्टिकोन की,माझ्या गावातील विद्यार्थी हा अधिकारी पदाधिकारी व्हावा कारण पूर्वी खूपच  हलाखीच्या जीवनातून  आम्हाला शैक्षणिक बाबतीत  एक वस्तू मिळायची तर एक मिळायची नाही म्हणून माझ्या या ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठा अधिकार  झाला तर माझ्या मनाला समाधान लाभेल अशा भावनेतून मोफत लेखन साहित्य भाऊसाहेब व सपत्नीसह तसेच मान्यवरांसह साहित्य वाटप करण्यात आले.
  यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार: श्री.पी.आर.पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments