नरडाणा--- कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या आदेशानुसार म. दि. सिसोदे कला, वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे आंतर राष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. नरडाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील यांनी आपले योगा विषयी थोडक्यात प्रास्ताविक केले व डॉ. यु. जी. पाटील इंग्रजी विभाग यांच्या मार्गदर्शनाने विविध योगा ची प्रात्यशीक करून घेण्यात आले. या वेळी वरिष्ट प्राध्यापक ए. आर वसावे, प्रा. व्ही बी खैरनार, बोढरे सर, ज्युनियर कॉलेजचे प्रा. शरद भामरे, प्रा. टी एस भामरे, प्रा. एन. एस. पाटील संस्थेचे सदस्य आदरणीय दादासाहेब सिद्धार्थ सिसोदे उपस्थितीत होते.आमच्या संस्थेचे र. म. सिसोदे ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी ही सहभागी होत्या. ह्या कार्यक्रमासाठी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रा. प्रदीप सोनवणे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments