Header Ads Widget

*दोंडाईचात पालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना...* *गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा...*




*जनमत-*

*दोंडाईचा-* येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची पुनर्स्थापना मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात आज सकाळी १०-०० वाजता करण्यात आली आहे.

यावेळी पुनर्स्थापना प्रंसगी माजी मंत्री डॉ. श्री हेमंतराव देशमुख, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनिल माने यांच्या उपस्थितीत दोंडाईचा अप्पर तहसीलदार आशा गांगुर्डे मँडम, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. श्री प्रवीण निकम यांनी केले.उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांनी यांनी श्रीफळ वाढवला. तत्पूर्वी अभियंता शिवनंदन राजपूत यांनी पुतळ्यास जलाभिषेक करत पूजा केली.

माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रामभाऊ माणिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष श्री दयाराम कुवर, श्री अमित दादा पाटील, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री भुषण कोळी यांनी माल्यार्पण केले.

माजी नगराध्यक्ष श्री नानाभाऊ मराठे, श्री शैलेश सोनार,श्री राका सिंधी,भाजपचे शहराध्यक्ष श्री प्रविण महाजन, करनी सेनेचे महामंत्री श्री राजू देशमुख, माजी बांधकाम सभापती श्री छोटू मराठे, श्री राकेश पाटील,श्री भुपेंद्र धनगर,श्री दिलीप पाटील,असलम शाह, श्री नरेंद्र कोळी, श्री रमेश बोरसे, श्री निखिल जाधव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख, अँड. श्री रवींद्र मोरे, श्री जितेंद्र चव्हाण,अँड. श्री प्रमोद मराठे, कय्युम पठाण, श्री घनश्याम राजपूत, बिलाल बागवान, श्री रवींद्र पाटील, श्री पिंटू महाजन, श्री शिवा खंडाळे ,श्री पिंटू खंडाळे,आबीद शेख, श्री जितेंद्र तिरमले, श्री योगेश तिरमले, श्री गणेश चकणे, श्री राकेश अग्रवाल,श्री वसंत कोळी, हुसेन बोहरी, श्री मनोजकुमार देशमुख, श्री बळीराम पाटील ,श्री जीवन भोई, श्री प्रताप सिसोदिया, श्री राजपाल चौधरी, माजी समाजवादी पक्षाचे उस्मान अशरफी, युवा सेना शहर प्रमुख श्री सागर पवार,श्री सागर पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments