Header Ads Widget

*दोंडाईचातील मायेचे पाझर- वसुधामाई देशमुख यांचा श्रद्धांजली पर कार्यक्रम...* *मरावे पण किर्ती रूपी उरावे-स्वर्गीय माईसाहेबांच्या जीवनाला सार्थकी म्हण...*




*नानांच्या स्पष्टवक्तापणाने काही कार्यकर्ते दुखावले तरी स्व. माईच्या शिव्या खाऊनही लोक जुळलेले...*

*लांबलेले-दुरावलेले अशी सर्वाची उपस्थिती श्रद्धांजलीपर कार्यक्रमाला अविस्मरणीय....*


*जनमत-*

*दोंडाईचा-* मायेचे पाझर काय असते? हे कोणाकडून शिकावे तर ते स्वर्गीय माईसाहेब देशमुख म्हणजे माजी मंत्री डॉ. नानासाहेब हेमंतराव देशमुख यांच्या स्वर्गीय धर्मपत्नीकडून शिकावे. ते म्हणतात ना,मरावे पर किर्ती रूपी उरावे, ही म्हण अक्षरशः माईसाहेबांच्या जीवनाला सार्थकी ठरते.माईसाहेबांनी डॉ. हेमंतराव देशमुख यांच्या जीवनात येण्या अगोदर आपल्या आई-वडिलांच्या सर्वसाधारण व लढाऊ-संघर्षमय परिवारातुन जीवनाचे धडे घेतले होते.म्हणून डॉ. नानासाहेब सोबत माईंचा जेव्हा लग्नानंतर संसाराचा गाडा सुरु झाला. तेव्हा डॉ. नानासाहेब दोंडाईचाला सरकारी हाँस्पीटलला खुप कमी मानधनावर वैद्यकीय अधीक्षक होते.तेव्हापासुन ते डॉ. नानासाहेब दोंडाईचा वरवाडे नगरपालीकेचे नगराध्यक्ष, हमाल-मापाडी संघाचे अध्यक्ष, बहुजन-दलित हरिजन सेवा संघाचे अध्यक्ष, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ते शिंदखेडा-शहादा मतदार संघाचे आमदार ते कायदा मंत्री पर्यंतचे लाल दिव्याचा प्रवास माईंनी त्यांचा पाहिला असल्यावर, जेव्हा डॉ. नानासाहेबांकडे पेंशटची गर्दीपासुन ते कार्यकर्त्याचा लाखोंचा गोतावळ्यापासुन स्वर्गीय माईंनी सर्वांना स़ाभाळले.थोडक्यात डॉ. नानासाहेबांच्या स्पष्टवक्तपणा व कडवे बोल टोचल्यामुळे कोणी जवळचे नातेवाईक-कार्यकर्ते दुखवले जरी गेले.तरी स्व. माईसाहेबांची प्रेमळ हाक-गोड शिव्या सर्वाना जवळ करून भाकरीचा दोन घास विचारत असे.म्हणून आजही डॉ. नानासाहेब परिवाराशी जेवढे लोक जुळलेले आहे.त्यात आज काही दुखावले-दुरावलेले जरी असले तरी ते वर्षातुन स्वर्गीय माईंच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाला उपस्थिती लावतात आणि हीच खरी देशमुख परिवारावरची  प्रेमाची पावती आहे, जी लोकांनी आजही टिकवून ठेवलेली आहे.

आज स्वर्गीय माईंचा श्रद्धांजली पर कार्यक्रम वसुधा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सकाळी ८-३० वाजता शहरी असो किंवा ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ते असो त्यांच्या अडचणी सुख दुःखात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्वर्गीय वसुधामाई  देशमुख यांच्या श्रद्धांजली पर कार्यक्रमात गत आठवणींना उजाळा देत सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

यावेळी माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री ज्ञानेश्वर भामरे, नंदुरबार जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्री वकिल पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शामकांत सनेर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी श्री शानाभाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष डॉ. श्री बापूसाहेब रविंद्रजी देशमुख, श्री प्रदीपभाऊ वाणी,श्री नानाभाऊ मराठे, श्री विक्रम पाटील,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री विठ्ठलसिंग गिरासे, माजी संचालक उद्योगपती श्री किशोर जैन,श्री प्रदीप पारख, मार्केट कमिटी सचिव श्री पंडित पाटील, सेवानिवृत्त सचिव श्री विजय पाटील, श्री जे पी गिरासे पत्रकार, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संचालक श्री अमित दादा पाटील,श्री प्रवीण चव्हाण, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रामभाऊ माणिक, हस्ती बँकेचे चेअरमन श्री कैलास जैन,करनी सेनेचे महामंत्री श्री राजू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष श्री दयाराम कुवर, माजी बांधकाम सभापती श्री राकेश पाटील, श्री भुपेंद्र धनगर,श्री दिलीप पाटील, श्री महेंद्र पाटील, श्री कैलास वाडीले, श्री प्रशांत पाटील,माजी नगरसेविका सौ. अनिताताई देशमुख,श्री अमर मराठे,श्री नंदू सोनवणे, असलम शाह, श्री रमेशकू बोरसे,श्री प्रताप भवरे, श्री प्रदिप चैनानी, शिंदखेडा पंचायत समितीचे सदस्य श्री राजेंद्र देवरे, माजी सदस्य श्री मनोहर देवरे, डोंगरगाव सरपंच श्री प्रकाश पाटील,जोगशेलू सरपंच श्री नितीन देसले, श्री गुलाबराव पाटील, बिलाल बागवान, रईस बागवान, अँड. श्री प्रदीप मराठे, कय्युम पठाण, मुन्ना खाटीक,श्री सचिन परदेशी, श्री जितेंद्र चव्हाण,श्री प्रतिक देशमुख, श्री पंकज चोळके, श्री रवींद्र पाटील, श्री गणेश चकणे,आबीद शेख,श्री जितेंद्र तिरमले, श्री पिंटू महाजन,श्री शिवा खंडाळे, श्री पिंटू खंडाळे, प्रशासकीय अधिकारी श्री गणेश चव्हाण, प्राचार्य श्री ए. डी. पाटील, विज्ञान महाविद्यालयाचे समन्वयक डॉ प्रा.बी.बी.पाटील, वसुधा स्कुलच्या प्राचार्या अंशूल कपूर मुख्याध्यापक श्री सी. जी. साळवे,श्री प्रकाश माळके,श्री एस. सी. पाटील, श्री दिनेश नांद्रे, सेवानिवृत्त प्रा.मदन केसे ज्ञानोपासक शैक्षणिक संकुलातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच यावेळी
प्रास्ताविक माजी सभापती श्री महेंद्र पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments