दिनांक २६/०६२०२२ वार रविवार
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी, येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकतीच राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,माता तुळजा भवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था.संचलित अगस्तमुनी माध्य.विद्यालय कलमाडी या विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय, मुख्याध्यापकआबासो.श्री.एस.ए.कदम होते व प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आबासो.श्री.जे.बी.पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंतर विद्यार्थांनी भाषणे दिली.त्यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री.पी.आर.पाटील,जे.डी.चव्हाण.एस.एस.पाटील, सी.जी.वारूडे,आदिंनी ही छत्रपती शाहूमहाराजच्या जीवना विषयी मनोभाव व्यक्त केलेत.
तद्नंतर कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे आबासाहेब श्री जे.बी.पाटील यांनी म्हटले की,सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी तसेच सर्व सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी झटणारे व आरक्षणाचे जनक म्हणून व बहुजनांना कैवारी ,मोठ्या दिलासा राजा ; - राजातील माणूस आणि माणसातील राजा म्हणजेच छत्रपती शाहूमहाराज होय इ.मनोभाव व्यक्त केलेत.
यानंतर शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी 'आदर्श राजा ' छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा नामोल्लेख केला त्यांनी स्वदेशी खेळ,व्यायाम व देश भ्रमण करून जनतेचे सुख दु:ख पाहिले,अधर्म,अंधश्रध्दा,जातीभेद,स्पृश्य स्पृश्य या विषयी चीड होती.तसेच शेती,व्यापार,उद्योग व शेतकऱ्यांची दैना व शिक्षण विकास नाही इ.गोष्टीविषयी जाणीव त्यावेळीची करून दिली व आदर्श राजा छत्रपती शाहू महाराज यांचे गुणवर्णन :- दूरदृष्टी,प्रेम,अन्यायाविषयीचीड,व्यवहारचातुर्य,आचरणशुद्ध,विवेकनिष्ठ,प्रेमळपणा,संघटना कौशल्य, क्रीडाकुस्तीकौशल्यता,तात्पतरता,कर्तव्यनिष्ठ,राष्ट्रनिष्ठा,त्याग.इत्यादी तसेच
सामाजिक,शैक्षणिक,बौद्धिक,धार्मिक सांस्कृतिक व पर्यावरण इ.आदर्श राजांविषयी महत्त्व पटवून दिले.
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,
शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.
यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले व आभार श्री.आर.बी.गवळे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आले.
0 Comments