Header Ads Widget

धुळे जिल्ह्यातील विधवा महिलांसाठी उपजिविकेचे साधन म्हणून एकल वात्सल्य समिती चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मदतीने पाच सिलाई मशीन चे वाटप



सोनगीर:-कोरोना साथीच्या कालावधीत घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं आणि त्यांना शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीनं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आतंरराष्ट्रीय महीला दिनाचे औचित्य साधून एकल वात्सल्य समिती चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मदतीने धुळे जिल्ह्यातील विधवा महीलांना सिलाई मशीन देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
   धुळे जिल्ह्यातील विधवा महिलांसाठी उपजिविकेचे साधन म्हणून एकल वात्सल्य समिती चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मदतीने पाच सिलाई मशीन चे वाटप करण्यात आले.कोरोणा एकल महीला पुनर्वसन समीती मिशन वात्सल्य समिती धुळे तालुका तसेच तहसीलदार गायत्री सैंदाणे,राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी दिपाली देसले, जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील, यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.२३) गुरुवारी आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील आशाबाई देवाजी पाटील (रा.फागणे), वैशाली शिवदास गायकवाड (रा.सोनगीर), सुनिता गजेंद्र देसले (रा.माळीच),विद्या भटू ठाकूर (रा.दोंडाईचा), मनिषा सोनवणे (रा.कर्ले)या पाच विधवा महीलांना सिलाई मशीन वाटप करण्यात आले आहे.गरीब आणि कष्टकरी महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली आहे.शिलाई मशीन मिळाल्याने या महिला आपल्या कुटुंबाचा खर्च भागवू शकणार आहेत.यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष पंकज गोरे,एकल वात्सल्य समिती चे अशासकीय सदस्य ईश्वर पाटील, धुळे तालुका समन्वयक पियुष शिंदे, योगेश शिरसाट,नवल ठाकरे, आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments