*राज्यातील राजकीय घडामोडींचा दोंडाईचा नगरपालीका निवडणुकीवर परिणाम होईल का?....*
*ज्यांना नाही जायचे जेलात-त्यांनी रहायचे बिळात...*
*अनेक भावी-इच्छुक उमेदवारांना-उमेदवारीची नावे देतांना लागली आहे भिती...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* सध्या राज्याच्या राजकारणात व महाविकास आघाडीच्या सरकार चालवण्याच्या मुद्द्यावर रोज उठून राजकारण होत असुन,रोज हे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर महाविकास आघाडीची सरकार स्थिरावली नाही व स्थिरावली आणि विरोधी पक्ष सत्तेत आला व नाही आला तर त्याचा परिणाम थेट दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेच्या राजकारणावर होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत आम्ही मागील तीन-चार दिवसापासुन जनमत- माध्यमातून विचारला असता, आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकार जर पुन्हा स्थिरावले तरी मतदानावर परिणाम होईल आणि विरोधी पक्ष जरी सत्तेत आला तरी त्याचा मतदानावर परिणाम होईल. फक्त प्रश्न-सवाल एकच गोष्टींचा आहे की,आम्हाला येथे सर्वाच्या बाबतीत म्हणायचे नाही आहे. पण ज्यांनी भष्ट्राचार-चुकीचे कामे-फसवणुक-बेहिशेबी मालमत्ता-खोटे दस्तावेज तयार केले असतील,अशांनी उमेदवारीच्या भानगढीत न पडता.गुपचूप आपला मार्ग बिळात-साधू-संताच्या दिशेने वळवून घ्यायचा.अन्यथा लढाईची-उमेदवारीची तयारी करायची असेल तर जेलात-कोठडीत-चार भिंतीच्या आत-नजर कैदेत जायची तयारी ठेवायची,असे मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे अनेक भावी-इच्छुक उमेदवारांची हवा टाईट झाली आहे. त्यामुळे सहाजिकच कोणताही उमेदवार आपल्या गट- पक्ष प्रमुख नेत्यापुढे स्वतः हून उमेदवारीसाठी आपले नाव द्यायला तयार नाही आहे. कारण काहींनी कारण नसताना,ह्या अगोदर म्हणजे निडणुक-उमेदवारी करण्या अगोदर फक्त सोबत रहायचे म्हणून यांची किमंत जेलात-कोठडीत-चार भितींत-नजर कैदेत राहून चुकवलेली आहे. म्हणून सत्ता कुणीचीही राज्यात बसो,त्याचा परिणाम थेट दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेच्या ह्यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर होणार आहे.त्यात निर्भय-निष्कलंक-निस्वार्थी उगवते नेतृत्व तिसरी आघाडी म्हणुन समोर आले तर जनता अशा नव्या चेहऱ्यांनाही स्विकारेल,,असे मत सध्या तरी जगजाहीर गावात लोक व्यक्त करत आहे.
सर्वसामान्य सुशिक्षित-सुसंस्कृत माणूस राजकारणाबाबत सहज म्हणतो,राजकारण हे भल्या माणसांचे काम नाही आहे. कारण राजकारण प्रवेशामुळे एखाद्या माणसाच्या आयुष्यात जेवढे बदल-आर्थिक-सामाजिक- राजकीय प्रगती कमी वेळात दाराशी लोटांगण घालून चालून येते तेवढीच जेव्हा नशीब खुंटते म्हणजे पक्षाची दिशा बदलते-उतरती कळा लागते-आपलेच आस्तीनचे साप-गद्दार-बंडखोर यांच्यामुळे प्रतिस्पर्धी-विरोधी पक्षाला आपल्यावर चाल करायला-सत्ता काबीज करायला-खोटे आरोप करायला-खोटे गुन्हे दाखल करायला संधी मिळते.तेव्हा राजकीय-सामाजिक-आर्थिक उंची गाठलेल्या माणसाची प्रतिमा क्षणात मलीन होते-तळागाळाला लागते-जेलमध्ये-कोठडीत-चार भिंतीच्या आत-नजर कैदेत जावून पार संपून जाते.राजकारण-समाजकारण- पद-प्रतिष्ठा नकोशी वाटायला लागते.
आज आपण केन्द्रापासुन राज्यापर्यंत असे अनेक चेहरे मागील अनेक वर्षापासुन-महिन्यांपासुन-दिवसांपासुन जेलमध्ये-कोठडीत-चार भिंतीत-नजर कैदेत आहे,असे आठवू शकतो.दुर कशाला जातात आपण आपल्या गावाचा राजकीय इतिहास मागील पाच-दहा वर्षापुर्वीचा चाळून पाहिला असता.त्यात मागील पाच-दहा वर्षांत काय-काय खरे-खोटे आरोप झाले. काय-काय खरे-खोटे गुन्हे पोलीस दप्तरी नोंद झाले. त्या गुन्ह्यांवर काय-काय,किती;किती चौकशा लागल्या व काय-काय तपासात प्रगती झाली व कोण-कोणत्या रथी-महारथी नावाजलेल्या लोकांना जेलमध्ये-कोठडीत-चार भिंतीत-नजर कैदेत रहावे लागले,हे जरी आठवले तरी सर्वसामान्य माणसाला राजकारणाची व राजकीय चोळी परिधान केलेल्या व्यक्तीची चिड येते.कारण राजकीय क्षेत्रात एखाद अपवाद वगळता जर कोणी सांगत असेल की,मी धुतल्या तांदुळापेक्षा पेक्षा पांढरा-निष्कलंक-निस्वार्थ- प्रामाणिक समाजसेवा करणारा लोहपुरूष आहे तर जनतेला कदापी विश्वास येणार नाही-बसणार नाही. कारण शंभरात असा एखाद अपवाद निघतो. म्हणून दुसऱ्यावर आरोप करणे-गुन्हे दाखल करणे-जेलमध्ये टाकणे जेवढे सोपे वाटते तेवढे स्वतः च्या अंतर्मनाने स्वतः ला आपण तपासले तर खरी परिस्थिती लक्षात येईल. पण सध्या माणूस स्वतः ला कमी तपासतो व दुसऱ्याकडे लगेच बोट करतो.म्हणुन राज्यातही सध्या जे सुरू आहे, त्या राजकीय उलथापालटचा दोंडाईचा नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर सहाजिकच परिणाम होणार असुन भावी-इच्छुक उमेदवार आतापासुनच सत्ता बसायची भिती खात आपल्या गटनेता-पक्ष प्रमुखाला उमेदवारीसाठी नाव देताना पुढे-मागे करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर गावाच्या राजकारणात तिसरी निस्वार्थ-निष्कलंक जनतेचे सेवा करणारे उगवते नेतुत्व उदयास आले तर जनता त्यांना मोठ्या मनाने स्विकारेल,असे बोलके चित्र गावात लोकांमध्ये उमटत आहे.
0 Comments