भोईटी (ता.शिरपूर) येथील हनुमानपाड्यातील शेतकरी भंगी भुरल्या पावरा (वय ३५) शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यातून कसे सावरावे असा प्रश्न पावरा यांच्या कुटुंबापुढे उभा राहिला. तहसीलदार आबा महाजन यांनी परिस्थिती समजून घेत भंगी पावरा याच्या मृत्यूबाबत अहवाल तयार करुन घेत शासनाकडे सादर केला. त्यामुळे पावरा यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तेव्हढ्यावरच न थांबता तहसीलदार आबा महाजन यांनी थेट हनुमानपाडा गाठले. तेथील शेतात मृत भंगी पावरा यांच्या पत्नी निर्मलाबाई यांना चार लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सरपंच दीपक पावरा, पोलिस पाटील दगडू ढिवरे, तलाठी अनिरुद्ध बेहळे, कोतवाल भिमसिंह भिल व ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदारांच्या या माणुसकीचे परिसरातून कौतुक करण्यात आले.
0 Comments