नरडाणा---पर्यटन व सांस्कृतिक, कार्य विभाग केंद्र सरकार, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या आदेशानुसार नरडाणा महाविद्यालयात "हर घर झंडा "हा उपक्रम राबवण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढा विषयी स्मुर्ती तेवत रहाव्या. स्वातंत्र्य संग्रामातील नायक, क्रांतिकारी, घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना जनमानसात रहावी, इतिहासाचे स्मरण असावे यानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रम अंतर्गत "हर घर झंडा " या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
नरडाणा महाविद्यालयात या प्रसंगी डॉ. प्रा. एस. पी. ढाके, प्रा. ए. ए. बोढरे क्रीडा संचालक महेंद्र नगराळे प्रा. उमेश पाटील डॉ. पी. जी. सोनवणे, प्रा. दत्तात्रय धिवरे उपस्थित होते. " हर घर झंडा "या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन नरडाणा महाविद्यालयात करण्यात आले.

0 Comments