शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी --- मुस्लिम या अल्पसंख्याक समाजातही अल्पसंख्यांक मुस्लिम तेली समाज आहे. आपल्या धुळे जिल्ह्यात तेली समाज गेली दीड-दोनशे वर्षांपासून वास्तव्यास आहे. मुस्लिम तेली समाजाचा पिढी जात व पारंपारिक व्यवसाय खायचे तेल गाळून विक्री करणे हा आहे. मुस्लिम तेली समाज बांधवांकडे वडिलोपार्जित लाकडी तेल घाणे असून तेल काढून विकण्याचा आमचा व्यवसाय होता, काहींकडे अजूनही आहे. तशा नोंदी, महसुली पुरावे समाज बांधवांकडे असूनही जिल्हा जात पडताळणी समिती धुळे यांच्याकडे ओबीसी प्रवर्गाच्या जात वैद्यतेचा प्रस्ताव सादर केला असता तो सरसकट फेटाळून लावला जात आहे. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतरही शैक्षणिक प्रवेशापासून समाजाची मुले वंचित राहत आहेत. यापूर्वी विभागीय जात पडताळणी समिती धुळे यांचे कडून मुस्लिम तेली समाजाला जात वैधता प्रमाणपत्र दिल्या गेले आहेत. मात्र जिल्हा जात पडताळणी समिती धूळे सादर केलेले प्रस्ताव फेटाळण्यासोबतच यापूर्वी ज्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिल्या गेले त्यांचेही रद्द करण्याबाबत नोटिसा पाठवत आहे.मुस्लिम तेली समाजावर हा प्रशासनाकडून होत असलेला मोठा अन्याय असून त्यामुळे समाजातील हजारो तरुण शिक्षण आणि नोकरी पासून वंचित राहून बेरोजगारीच्या खाईत ढकलले जात आहेत यासाठी धुळेच्या जात पडताळणी समितीची आड मोठी भूमिका कारणीभूत असून आम्हा मुस्लिम तेली समाजाची अडवणूक ही समिती करीत असल्याची आम्हा समाज बांधवांची धारणा झाली आहे. तेव्हा समाज कल्याण मंत्री म्हणून आम्हा समाज बांधवांच्या या निवेदनाचा योग्य तो विचार करून आपण आम्हाला न्याय द्यावा यासाठी शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तेली मुस्लिम समाज धुळे
जिल्हा धुळे
सन्वयक,मुस्लिम तेली कास्ट वेलीडिटिं,महाराष्ट्र राज्य श्री इरफान इब्राहिम मलनस
(अध्यक्ष महाराष्ट्र)
अंतराष्ट्रीय मानव अधिकार फेडरेशन तथा समन्वयक अभ्यासक :मुस्लिम कास्ट वेलीडिटी महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम तेली समाजाचे तालुकाध्यक्ष
आमीर एस जिंदरान यांच्या नेतृत्वात प्रसंगी सिद्दिक तेली, यलगार तेली, सद्दाम तेली, सागर तेली, साद तेली, हुसैन तेली, अकरम तेली आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments