-शिंदखेडा ( यादवराव सावंत प्रतिनिधी )- शिंदखेडा तालुक्यात साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सुलवाडे बॅरेजमधील पाणी शेतकऱ्यांच्या
शेतीपावेतो पोहचवा असे आवाहन प्रास्ताविक तुन शिंदखेडा शहरातील जेष्ठ पत्रकार प्रदीप दीक्षित यांनी दीपावली निमित्त आयोजित रामकृष्ण पाटील आयोजित केलेल्या शुभेच्छा भेट प्रसंगी केले प्रसंगी माजी आमदार रामकृष्ण पाटील म्हणाले सुलवाडेसह, वाडी शेवाडे, अमरावती, प्रकल्पाबाबतही प्रयत्न करू त्यासाठी पत्रकारानीही साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. दरवर्षी माजी आमदार रामकृष्ण पाटील हे दिवाळी निमित्त पत्रकार बंधुंची सदिच्छा भेट घेऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हितगुज करतात. न विसरता गेल्या बावीस वर्षांपासून जनसंपर्क कार्यालयात सातत्याने हा उपक्रम सुरू आहे मी हयात असेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले. शिवाय ह्यावेळी शेतकरी हा माझा प्राण आहे म्हणून मी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असे आश्वासन देत वाडी शेवाळे व सुलवाडे बॅरेजमधील पाणी शेतीसाठी उपयुक्त आहे ते पोहचवण्यासाठी मी प्रयत्न करणार रस्त्यावर उतरून जन आंदोलन करणार आहे.फक्त तुमची साथ हवी आहे .असे माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांनी सांगितले. जनसंपर्क कार्यालयात आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांची, गोरगरिबांचे प्रश्न, आरोग्य योजनेचा लाभ, कोणत्याही प्रकारची समस्या सोडविण्यासाठी चला तात्यासाहेब कडे अशी हाक घेऊन नागरिक मोठ्या उत्साहात येत असतात पण कोणत्याही प्रकारची अभिलाषा न करता सहजपणे सोडून मनाचा दिलदार म्हणजे रामकृष्ण देव अवतरला आहे असे सहज म्हणून मला पुन्हा ह्या मतदारसंघात असा आमदार हवा आहे. पैसे देऊन आमदार निवडून येऊ शकतो हा भ्रम दूर करावा लागेल. काम करणारा शेतकऱ्यांचा राजा एक वेळ आमदार व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे ते सहज शक्य आहे. ह्यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश चौधरी, प्रा. प्रदीप दिक्षित, दिपक माळी, जी.पी.शास्री ,सी डी डागा सतिश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी विजयसिंह गिरासे, भिका पाटील, यादवराव सावंत, अशोक गिरणार, जितेंद्र मेखे, विनायक पवार, आदी उपस्थित होते.


0 Comments